Bhau Kadam  Instagram/@bhaukadamofficial
मनोरंजन बातम्या

HBD Bhau Kadam : काम मिळत नसल्याने इंडस्ट्री सोडणार तोच नशीब फळफळलं; भाऊ कदमचा झिरो ते हिरो प्रेरणादायी प्रवास

Bhau Kadam Journey : भाऊ कदमने त्याच्या अभिनय कारकिर्दीत अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे

Pooja Dange

Bhau Kadam Career : निरागस चेहरा आणि कमाल विनोदबुद्धी असलेला कलाकार म्हणजे भाऊ कदम. आज भाऊ कदमचा ५१ वा वाढदिवस आहे. १२ जून १९७२ साली भाऊ कदमचा जन्म झाला. चला तर पाहूया भाऊ कदम यांचा आतापर्यंतचा प्रवास.

भाऊ कदम चर्चेत आले ते म्हणजे 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे. त्यांची कॉमेडी आणि निरागसरता सगळ्यांचे मन जिंकून गेली. अशा या भाऊच बालपण वडाळ्यातील बीपीटी कॉर्टर्समध्ये गेलं. वडिलांच्या निधनानंतर भाऊ आणि त्याची कुटुंब डोंबिवलीत शिफ्ट झालं.

अभिनय कारकिर्दीची सुरूवात

भाऊ कदमने त्याच्या अभिनय कारकिर्दीत अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. विजय निकम यांचे 'जाऊ तिथे खाऊ' हे नाटक भाऊच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरला. कारण भाऊ काम मिळत नसल्याने अभिनयातून माघार घेत होता. नाटकांमध्ये सक्रिय असलेल्या भाऊला तीन वेळा 'फु बाई फु' ची ऑफर करण्यात आले होते.

स्वभावाने शांत आणि लाजाळू असल्याने भाऊला स्टॅन्डअप कॉमेडी जमणार नाही असे वाटले. परंतु तिसऱ्यांदा आलेली संधी भाऊने स्वीकारली आणि 'फु बाई फु'च्या सहाव्या पर्वाचा तो विजेता ठरला. त्यानंतर अनेक सोहळ्यांना भाऊ कदमचे शो होऊ लागले. त्याची पॉप्युलॅरीटी वाढली.

भाऊ कदमचे चित्रपट

नाटकनंतर भाऊला चित्रपटांच्या देखील ऑफर येऊ लागल्या. भाऊने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. त्यातील नशीबवान हा चित्रपट खूप गाजला.

त्याचसह भाऊने टाइमपास ३, टाइमपास २, टाइमपास, सांगतो ऐका, मिस मॅच, पुणे विरुद्ध बिहार, नारबाची वाडी, कोकणस्थ, चांदी, मस्त चाललंय आमचं, बाळकडू, पांडू, व्हीआयपी गाढव, वेडिंगचा शिनेमा, सायकल, शिकारी, जगावेगळी अंतयात्रा, बॉइज, हाफ टिकिट या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर घे डबल हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येईल. (Movie)

भाऊच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर, त्याला ३ मुली आणि एक मुलगा आहे. भाऊंची मोठी मुलगी मृण्मयी कदम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. लाईफस्टाईल, फॅशन, मेकअपवर व्हिडीओ, व्लॉग करत असते. तसेच ती कॉमेडी व्हिडिओ देखील करत असते. ज्यात कधी-कधी संपूर्ण कुटुंब सहभागी असत. (Celebrity)

भाऊच्या लव्हस्टोरी विषयी फार कमी लोकांना माहीत आहे. एका कार्यक्रमात भाऊची पत्नी ममता त्याची विद्यार्थिनी होती असं सांगितलं होतं. १० वी मध्ये एका विषयात नापास झाल्याने भाऊ कदमकडे ममता शिकवणीला यायच्या.

ममता यांच्या स्वभाव भाऊला आवडला आणि त्याने तिला लग्नासाठी विचारले. मागणी घातल्यानंतर २-३ दिवस विचार करायला घेतले होते. घरी आई-बाबांना विचारूनच लग्नाला होकार दिल्याचे तिने सांगितलं. तर इतक्या वर्षाचा सुखाचा संसार एकमेकांच्या साथीने करत असल्याचेही सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज - उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भेटीची इनसाइड स्टोरी काय? बघा VIDEO

BMC Election: मिशन बीएमसी; शिवसेनेनं महापालिकेसाठी कंबर कसली, 21 शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

Thursday Horoscope : विनाकारण खर्च वाढणार, प्रेमात धोका मिळणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Live News Update : मंत्री भरत गोगावले यांना पोलादपुरमध्ये महिला बचत गटातील महिलांना मोलाचा सल्ला

Pune : पुण्यात खळबळ! रस्त्याच्या कडेला आढळलं ५ महिन्यांचं मृत अर्भक

SCROLL FOR NEXT