Kapil Sharma  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kapil Sharma : कॉमेडी किंग कपिल शर्माचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, 'तो' व्हिडीओ पाहून चाहते चकित

Kapil Sharma Weight Loss : कॉमेडी किंग कपिल शर्माने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. त्याच्या एका व्हिडीओमध्ये त्याचे वजन कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

कॉमेडी किंग कपिल शर्माने (Kapil Sharma) आजवर जगाला हसवले आहे. त्यांच्या विनोदी शैलीचे चाहते दिवाने आहेत. तो एक उत्तम अभिनेता देखील आहे. त्याने अनेक चित्रपटात काम देखील केले आहे. नुकताच कपिल शर्माने देवदर्शनाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. मात्र या व्हिडीओमधील कपिल शर्माचा लूक पाहून चाहते चकित झाले आहेत.

कपिल शर्माने नुकतेच भोपाळमधील भोजपूर शिवमंदिरला भेट दिली आहे. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तो भगवान शंकराचे आर्शीवाद घेताना पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या शेवटी कपिल त्याचा चाहत्यांना भेटताना दिसत आहे. या व्हिडीओला कपिलने खास कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिलं की, "भोपाळ येथील भोजपूर शिवमंदिरकडून खूप आशीर्वाद...राजा भोजने ११व्या शतकात बांधले, हा वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. तुम्ही भोपाळमध्ये असाल तर भेट द्या. हर हर महादेव..."

कपिल शर्माचा हा व्हिडीओ पाहून मात्र चाहते चकित झाले आहेत. व्हिडीओमध्ये कपिल शर्मा प्रचंड बारीक झालेला दिसतोय. त्याचे वजन कमी झाले आहे. त्याचे हे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. कपिलला अनेक वेळा त्याच्या वाढत्या वजनामुळे ट्रोल केले गेले आहे. मात्र कपिल शर्माचा हा व्हिडीओ ट्रोल करणाऱ्या लोकांसाठी सडतोड उत्तर आहे. कपिलचा हा लूक अनेकांना आवडला आहे. सोशल मीडियावर आता त्यांच्या कमी वजनाची चर्चा रंगली आहे.

कपिलच्या या ट्रान्सफॉर्मेशनमुळे त्याची तब्येत बिघडली नाही ना?, नवीन चित्रपटाची तयारी सुरू आहे का?, तर एवढे वजन कमी कसे केले? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget Plan: जिओनंतर 'या' कंपनीने दिला धक्का! लोकप्रिय आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आता बंद

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

SCROLL FOR NEXT