Shreya Maskar
सकाळी नाश्त्याला 'पनीर भुर्जी रोल' खा. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
पनीर भुर्जी बनवण्यासाठी पनीर, साजूक तूप, जिरे, हळद, मिरपूड, आलं, लसूण, कांदा, गाजर, टोमॅटो आणि शिमला मिरची, हिरवी मिरची इत्यादी साहित्य लागते.
पनीर भुर्जी बनवण्यासाठी पॅनमध्ये साजूक तूप, जिरे, हळद , हिरवी मिरची, लसूण घालून मिक्स करा.
यात बारीक चिरलेला कांदा, गाजर, टोमॅटो आणि शिमला मिरची टाकून फ्राय करा.
त्यानंतर यात चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला.
सर्व भाज्या १० मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या.
वजन कमी करायला मदत करणारी पनीर भुर्जी तयार झाली.
गरमागरम चपातीवर पनीर भुर्जी पसरवून तिचा रोल बनवून 'पनीर भुर्जी रोल'चा आस्वाद घ्या.