Shreya Maskar
नानकटाई बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, तूप, पिठीसाखर, डेसीनेट कोकोनट , दूध, ड्रायफ्रूट्स आणि टुटी फ्रुटी इत्यादी साहित्य लागते.
नानकटाई बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये पिठीसाखर आणि तूप मिक्स करून घ्या.
आता यात गव्हाचे पीठ टाकून छान मळून घ्या.
कणिकचे छोटे गोळे करून त्याला नानकटाईसारखा आकर द्या.
आता यावर डेसीनेट कोकोनट, ड्रायफ्रूट्स आणि टुटी फ्रुटी घाला.
इडली पात्राला तूप लावून त्यात नानकटाई ठेवा.
10-15 मिनिटे नानकटाई छान बेक करून घ्या.
खुसखुशीत नानकटाई मुलांच्या डब्यात स्नॅक्स म्हणून द्या.