Thalipeeth Recipe : भाजणीशिवाय करा खमंग-खुसखुशीत थालीपीठ, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Shreya Maskar

थालीपीठ

भाजणीशिवाय थालीपीठ बनवण्यासाठी पोहे भिजवून त्याचे पाणी काढून बाऊलमध्ये घ्या.

Thalipeeth | yandex

गव्हाचे पीठ

यात ज्वारी, गव्हाचे पीठ आणि बेसन घालून छान मिक्स करा.

Wheat flour | yandex

कांदा-मिरची

पुढे पिठात बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरचीची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट, हळद, पांढरे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.

Onion | yandex

पाणी

आता तेल आणि पाण्याच्या मदतीने पीठ व्यवस्थित मळून घ्यावे.

Water | yandex

कॉटन रुमाल

कॉटनचा रुमाल पाण्यात भिजवून त्यावर थालीपीठ थापून घ्या.

Thalipeeth | yandex

छोटी छिद्रे

थालीपीठाच्या पोळीवर छोटी छिद्र पाडून घ्या, जेणेकरून थालीपीठ छान शिजेल.

Small holes | yandex

तुपाचा वापर

एका पॅनमध्ये तूप टाकून थालीपीठ दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.

ghee | yandex

पुदिन्याची चटणी

पुदिन्याची चटणी आणि दहीसोबत थालीपीठाचा आस्वाद घ्या.

Mint chutney | yandex

NEXT : 'इडली'पासून बनवा चटपटीत नाश्ता, मुलं अन् नवरा होईल खुश

Idli Recipe | Saam TV
येथे क्लिक करा...