Shreya Maskar
रात्रीच्या इडल्या उरल्या असतील तर सकाळी इडली चाट बनवा.
इडली चाट बनवण्यासाठी इडल्या, दही, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, शेव, लाल तिखट, चाट मसाला, मीठ, कोथिंबीर आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
इडली चाट बनवण्यासाठी रात्रीची इडली सकाळी पॅनमध्ये तेल टाकून परतून घ्या.
आता एका बाऊलमध्ये इडलीचे छोटे तुकडे करून घ्या.
यात फेटलेले दही, कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून मिक्स करा.
मिश्रण चांगले मिक्स झाल्यावर त्यात शेव आणि चिली फेक्स टाका.
या मिश्रणात घाट मसाला आणि मीठ टाकून मिक्स करा.
शेवटी कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी आवर्जून टाका.