Vishakha Subhedar Saam TV
मनोरंजन बातम्या

Vishakha Subhedar Look: 'एकदा येऊन तर बघा'मध्ये विशाखा सुभेदार साकारणार शार्प शूटरची भूमिका; अभिनेत्री डॅशिंग रावडी लूक आऊट

Vishakha Subhedar Movie: विशाखा ‘मगरु’ या ‘शार्प शूटरची भूमिका साकारत आहे.

Pooja Dange

Upcoming Marathi Movie:

अभिनेत्री विशाखा सुभेदार विविध धाटणीच्या भूमिका साकारते. पण तिच्या विनोदी शैलीचे अनेक चाहते. आणि कॉमेडीमध्ये तिचा हात कोणीही धरू शकत नाही. विशाखा आता एका नव्या चित्रपटातून आपले मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. या नवीन चित्रवतातील तिचा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या चित्रपटामध्ये विशाखा सुभेदार बेधडक आणि डॅशिंग अंदाजात दिसणार आहे. हातात बंदूक, लेदर जॅकेट, हातात सेफ्टी गार्ड अशा बायकर लूकमध्ये विशाखा दिसत आहे. तर तिला पाहून ती या चित्रपटटामध्ये नकारात्मक भूमिका साकारणार असल्याचे स्पधत होत आहे. विशाखा 'शूटर' लूक तिचा नवीन चित्रपट ‘एकदा येऊन तर बघा’मधील आहे. या चित्रपटात विशाखा ‘मगरु’ या ‘शार्प शूटरची भूमिका साकारत आहे. मगरू शार्प शूटर 'डॅशिंग रावडी लूक' मध्ये दिसत आहे.

विशाखा सुभेदार तिच्या या चित्रपटातील भूमिकेविषयी सांगितलं म्हणाली, 'ही अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका साकारताना मेकअप, बॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागतं. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात.' एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचं विशाखाने सांगितलं आहे.

'एकदा येऊन तर बघा' हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकरने केले आहे. नुकताच या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर खूपच भन्नाट आहे. प्रसाद खांडेकर यांचा हा चित्रपट म्हणेज कॉमेडीची मेजवानी असणार आहे, हे ट्रेलरवरून लक्षात येईल.

विशाखासह या चित्रपटामध्ये गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार अशी कलाकारांची भली मोठी फौज आहे. अभिनेता प्रसाद खांडेकरने 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. (Celebrity)

विशाखा सुभेदार मालिकांसह, चित्रपट आणि नाटकांमध्ये देखील सक्रिय आहे. विशाखाने ओटीटी विश्वात देखील पदार्पण केले आहे. काही महिन्यांपूर्वी विशाखा सुभेदारची 'एका काळेचे मणी' ही वेबसीरीज जीव सिनेमावर प्रदर्शित झाली. तसेच 'कुर्रर्रर्र' हे नाटक देखील रंगमंचावर सुरू आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी परतीच्या पावसाचा धुडगूस

Raigad Shocking : रायगडमधील कोट्यवधींच्या अपहार प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुख्य आरोपीने मेहुणीच्या घरात आयुष्य संपवलं

Ladki Bahin Yojana: १२ हजार भावांनी मारला लाडकी बहिणींच्या पैशांवर डल्ला; योजनेत १६४ कोटींचा घोटाळा

Sonali Kulkarni: गुलाबी साडी अन् लाली...; सोनाली कुलकर्णीचा दिवाळी स्पेशल लुक, पाहा फोटो

Maharashtra Weather Alert: ऐन दिवाळीत पावसाने घातला धुमाकूळ; पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT