Comedian Raju Srivastav SAAM TV
मनोरंजन बातम्या

Raju Shrivastav: 'द किंग ऑफ कॉमेडी' पदवी कमवणाऱ्या 'गजोधर भैय्या'चा जीवनप्रवास...

राजू श्रीवास्तव यांनी आपल्या संघर्षाच्या जोरावर एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

Chetan Bodke

Raju Shrivastav: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा आज जन्मदिवस. 25 डिसेंबर 1963 रोजी जन्मलेले राजू श्रीवास्तव 'गजोधर भैय्या' या नावाने सर्वश्रृत होते. राजू श्रीवास्तव यांच्या विनोदावर आणि जबरदस्त कॉमेडीवर चाहतावर्ग पोट धरुन हसायचा. राजू श्रीवास्तव यांनी आपल्या संघर्षाच्या जोरावर एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं खरं नाव सत्य प्रकाश होते, पण ते राजू श्रीवास्तव या नावाने ओळखले जायचे. राजूला शब्दांचे कौशल्य त्यांच्या वडिलांकडून मिळाले होते. वास्तविक त्यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव कानपूरचे लोकप्रिय कवी होते आणि आपल्या कवितांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे. तर राजू श्रीवास्तव त्यांच्या कविता लक्षात ठेवत आणि शाळेतल्या मित्रांना ऐकवायचे.

राजू यांना लहानपणापासूनच कॉमेडीची फार आवड असल्याने ते कोणाचीही मिमिक्री करण्यात फारच पटाईत होते. राजू श्रीवास्तवचा विनोदी अभिनेता होण्याचा प्रवास सोपा नव्हता. मुंबईतही त्यांना बरेच चढ- उतार सहन करावे लागले. मुंबईसारख्या शहरात खर्च फार होत असल्याने पैसे फार कमी पडायचे, अशा परिस्थितीत खर्च भागवण्यासाठी राजू मुंबईत ऑटो चालवायचे. राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या कॉमेडीसाठी सुरुवातीला 50 रुपये मिळायचे.

कुटुंबाची स्थिती हालाकीची असल्याने त्यांना शाळेची फी देखील परवडत नव्हती. पण शाळाप्रशासनाने त्यांची स्थिती पाहून फी माफ केली होती. सोबतच त्यांच्यातील गुण पाहून शिष्यवृत्तीही मिळाली होती. राजू यांनी आपल्या करियरची सुरुवात 'टी टाइम मनोरंजन' केले होते पण 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चैलेंज' ने बरेच प्रकाशझोतात आणले. राजू श्रीवास्तव यांना 'द किंग ऑफ कॉमेडी'ची पदवी मिळाली असली तरी त्यांनी चाहत्यांचे आपल्या फ्री स्टाईलमध्ये निखळ मनोरंजन केले.

याशिवाय, कॉमेडी क्षेत्रात प्रसिद्ध होण्यापूर्वी त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले होते. राजू श्रीवास्तव प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस 3 चा देखील भाग होते. सर्वांना हसवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी २१ सप्टेंबर २०२२ रोजी या जगाचा निरोप घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT