Madhur Virli Saam Tv
मनोरंजन बातम्या

प्रणित मोरेनंतर आणखी एका कॉमेडियनने मागितली माफी; बलात्कारावर केलेल्या विनोदावरून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट

Madhur Virli: बलात्कारावरील विनोदामुळे टीकेचा सामना करणाऱ्या कॉमेडियन मधुर विरलीने सार्वजनिक माफी मागितली. सोशल मीडियावर निवेदन जारी करत चूक मान्य केली आहे.

Shruti Vilas Kadam

Madhur Virli: प्रणित मोरेच्या शोमध्ये झालेल्या ३७० रुपयांची बिर्याणी आणि सेजल पवारने मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरुन केलेल्या आक्षेपार्ह कमेंटनंतर आता आणखी एका प्रसिद्ध कॉमेडियना त्याच्या एक जुन्या व्हिडिओमुळे मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. स्टँड-अप कॉमेडी विश्वातील परिचित नाव असलेले कॉमेडियन मधुर विरलीने बलात्कारासारख्या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर विषयावर केलेल्या विनोदामुळे त्याच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. वाढत्या वादानंतर अखेर मधुर विरलीने सार्वजनिकरित्या माफी मागत आपल्या यूट्यूब चॅनेलवरही स्पष्टीकरणासह माफीनामा प्रसिद्ध केला.

सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात मधुर विरलीने आपल्या विनोदामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे मान्य केले. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, माझ्या विनोदामुळे ज्यांना त्रास झाला किंवा ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्यांच्याप्रती मी खरोखरच दिलगिरी व्यक्त करतो. माझा उद्देश कुणाच्याही वेदना कमी लेखण्याचा किंवा अशा गंभीर विषयाची थट्टा करण्याचा नव्हता.”

दिल्लीतील रहिवासी आणि आयआयटी पदवीधर असलेल्या मधुर विरलीने पुढे लिहिले सांगितले की, सध्या चर्चेत असलेली क्लिप ही सुमारे दोन वर्षांपूर्वीच्या एका स्टँड-अप शोमधील आहे. कार्यक्रमानंतर संबंधित भाग अयोग्य वाटल्याने तो त्याच वेळी काढून टाकल्याचा दावाही त्याने केला. मात्र, त्या व्हिडिओचा काही भाग पुन्हा सोशल मीडियावर समोर आल्यानंतर नव्याने वाद निर्माण झाला. ही माझी चूक झाली, त्यातून शिकलो,पण पुन्हा असे होणार नाही.

मधुर विरलीने कोणता विनोद केला

या शोमध्ये तो म्हणाला की 'आपल्याकडे दररोज १० बलात्काराच्या केस घडतात. यातील १ केस अशी असते ज्यामध्ये हत्या आणि बलात्कार देखील होते. ती एक केस अशी असते जिथे मुलगा उभा राहिल्यावर मुलगी बोलते अरे.... कडल राहिलं.' हा विनोद नेटकऱ्यांना न आवडल्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग झाली. कारण यामध्ये त्याने अत्याचार झालेची चुकीच्या प्रकारे मस्करी करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT