Bhuvan Bam Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhuvan Bam: 29 वर्षाच्या युट्यूबरचं स्वप्न पूर्ण, दिल्लीत खरेदी केलं 11 कोटींचं आलिशान घर

Bhuvan Bam Buy Bunglow In Delhi: युट्युबरने दक्षिण दिल्लीतील खरेदी केलेल्या या बंगल्यासाठी सुमारे 77 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. भुवनवर सध्या त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Priya More

Comedian And Youtuber Bhuvan Bam:

दिल्लीतील (Delhi) लोकप्रिय यूट्यूबर, लेखक, गायक, गीतकार आणि कॉमेडियन भुवन बाम (Bhuvan Bam) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. भुवनचे स्वप्न पूर्ण झालं आहे. त्याने राजधानी दिल्लीतील पॉश एरिया ग्रेटर कैलाश भागात आलिशान बंगला खरेदी केला आहे. भुवनच्या नव्या घराची किंमत ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

CRE Matrix च्या रिपोर्टनुसार, भुवन बामने दिल्लीतील हा आलिशान बंगला 11 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बंगला खरेदीशी संबंधित कागदपत्रांची प्रत विभागीय अधिकाऱ्यांनी त्याला दिली आहे. युट्युबरने दक्षिण दिल्लीतील खरेदी केलेल्या या बंगल्यासाठी सुमारे 77 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे.

या प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन मागच्या वर्षी 7 ऑगस्टला झाले होते. भुवन बामच्या नवीन बंगल्याचे क्षेत्रफळ सुमारे 1,937 चौरस फूट आहे. तर या बंगल्याचे एकूण क्षेत्रफळ 2,233 चौरस फूट इतके आहे. भुवन बामने अद्याप या बंगल्याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. महत्वाचे म्हणजे, भुवन बाम हा फक्त 29 वर्षाचा आहे. ऐवढ्या कमी वयामध्ये त्याने इतकं मोठं नाव कमावलं आहे.

कॉमेडियन आणि युट्यूबर भुवन बामचा युट्यूबवर 'BB की Vines' नावाचा कॉमेडी चॅनल आहे. भुवन बामचे खरं नाव भुवन अरविंद्र शंकर बाम असे आहे. त्यांच्या कामामुळे तो लोकांमध्ये भुवन बाम म्हणून लोकप्रिय आहे. भुवन बाम हा मूळचा गुजरातमधील वडोदरा येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. भुवनला लहानपणापासूनच गाण्याची आणि नवीन क्रिएटीव्हिटीची आवड आहे. त्यांचा आवाज खूपच चांगला आहे त्यामुळे त्याने गायनाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला.

भुवनने दिल्लीतील एका छोट्या रेस्टॉरंटमधून आपल्या गायनाची सुरुवात केली. सुरुवातीच्या दिवसांत तो महिन्याला फक्त ५,००० रुपये कमवू शकत होता. भुवन बाम यांचे वैशिष्ट्य म्हणजे गाणी गाण्यासोबतच तो स्वत: गाणी लिहितो देखील. भुवन बामने दिल्लीतील ग्रीन फील्ड स्कूलमधूल शिक्षण घेतले. त्यांनी शहीद भगतसिंग महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना आमदाराच्या पत्नीसमोर चित्रलेखा पाटील म्हणाल्या ५० खोके...; सुरूवातीला बाचाबाची नंतर धक्काबुक्की; VIDEO व्हायरल

Ban Online Betting Games: मोदी सरकारचा आणखी एक स्ट्राईक; ऑनलाइन बेटिंग गेम्सवर आणणार बंदी

Crime: दारूच्या नशेत बायकोवर कुऱ्हाडीने वार, नंतर धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या; जळगाव हादरले

Maharashtra Rain: राज्यात पावसाचे धुमशान! रेल्वेसेवेला मोठा फटका, २०-२१ ऑगस्टला लांबपल्ल्याच्या ट्रेन्स रद्द; वाचा लिस्ट

Maharashtra Rain Live News: मुंबईसाठी उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळां-महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत अद्याप निर्णय नाही: BMC

SCROLL FOR NEXT