Subi Suresh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Subi Suresh Passed Away: सगळ्यांना हसवणारी आज रडवून गेली, प्रसिद्ध कॉमेडीयनचं वयाच्या ४१ व्या वर्षी निधन

प्रसिद्ध कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट सुबी सुरेशचे वयाच्या ४१ व्या वर्षी निधन झाले आहे.

Chetan Bodke

Subi Suresh News: प्रसिद्ध कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट सुबी सुरेशचे वयाच्या ४१ व्या वर्षी निधन झाले आहे. विनोदी कलाकार आणि टीव्ही होस्ट यकृाताशी संबंधित (Liver) आजाराने त्रस्त होती. बुधवारी सकाळी तिने कोची येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

सुबी सुरेशने आपल्या करियरची सुरुवात मिमिक्री आर्टिस्ट म्हणून केली होती. मात्र 'सिनेमाला' (Cinemala) या एव्हरग्रीन कॉमेडी शोमध्ये एन्ट्री करताच ती अधिकच प्रकाशझोतात आली. शोमधील तिचा मस्तीखोर अंदाज पाहून चाहत्यांच्या संख्येत अधिकच दिवसेंदिवस वाढ होत गेली.

अनेक शो मधून लोकप्रियता मिळवणाऱ्या सुबीला मल्याळम चित्रपटांमध्येही काही मोजक्याच भूमिका मिळाल्या होत्या. त्या भूमिका तिच्या अधिकच जबरदस्त ठरल्या. ती 'हॅपी हसबंड्स', 'कंकणसिंहासनम' आणि बरेच काही मध्ये कॉमिक भूमिका करताना दिसली होती.

'सिनेमाला' या कार्यक्रमानंतर टेलिव्हिजनमध्ये 'कुट्टी पट्टलम' या लहान मुलांच्या शोने लक्ष वेधून घेतले. मुलांसोबतचे तिचे मजेदार संवाद सर्वांच्या नेहमीच पसंदीचे होते. सुबी सुरेशच्या अचानक एक्झिटने संपूर्ण मनोरंजन क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Operation Tiger : ओमराजे निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार? आदित्य ठाकरेंच्या विधानाने राजकीय खळबळ

MUMBAI Local : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! लोकलवर कोणताही ब्लॉक नाही, ट्रेन रद्द नाहीत, पाहा अपडेट

Maharashtra Weather : मोठी बातमी! पुढील ३ दिवसांत पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

Pune Fort : सह्याद्रीतील दगडात कोरलेला अद्भुत किल्ला, पुण्यातील ‘हे’ ठिकाण जपतेय इतिहासाचा वारसा

SCROLL FOR NEXT