Kannada Film Director: दाक्षिणात्य सिनेसृष्टी शोकाकुल! सुप्रसिद्ध कन्नड दिग्दर्शकाचे निधन

वयाचे ८९व्या वर्षी एसके भगवान यांचे निधन.
S K Bhagavan Passes Away
S K Bhagavan Passes Away Saam TV
Published On

Famous Director S K Bhagavan Died: दाक्षिणात्य सिनेसृष्टीला गेल्या दोन दिवसांपासून दुःख घटना सहन कराव्या लागत आहेत. तारक रत्न आणि मायिलसामी यांच्या निधनानंतर आता कन्नड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसके भगवान यांचे निधन झाले आहे.

एसके भगवान यांचे काल बंगळुरू येथे निधन झाले आहे. एसके भगवान ८९ वर्षाचे होते आणि काही काळापासून वृद्धापकाळाने आलेल्या आजारांनी ग्रस्त होते. भगवान यांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

S K Bhagavan Passes Away
Gauri Khan Trolled: गौरी खान झाली एका साध्या फोटोमुळं ट्रोल, चाहत्याने बाजू घेत मांडली नेटकऱ्यांसमोर बाजू

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एसके भगवान यांचे निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले आहे की, 'कन्नड चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसके भगवान यांच्या मृत्युची बातमी ऐकल्यानंतर खूप दुःख झाले. मी प्रारठण करतो की देव त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो.'

तसेच बसवराज यांनीही दुसरे ट्विट करत लिहिले आहे की, दोरे-भगवान यांच्या जोडीने कन्नड चित्रपट सृष्टीला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. भगवान यांनी त्यांचे मित्र दोराई राज यांच्यासह कस्तुरी, एराडू, बयालू दारी, गिरि कान्ये, र्हास लेकुक'सह ५५ चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

एसके भगवान यांचा जन्म ५ जुलै १९१३ साली झाला. त्यांनी त्यांचे शिक्षण बंगळुरू येथून केली. भगवान यांना नाटकांसाठी ओळखले जात. प्रभाकर शात्री यांच्यासोबत त्यांनी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. 'भाग्योदय' चित्रपटामध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पहिले होते. १९६६सालीप्रदर्शित झालेला 'संध्यारागा' या एसके भगवान दिग्दर्शित पहिला चित्रपट होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com