'आई तुळजाभवानी' मालिकेत नवरात्री स्पेशल भाग पाहायला मिळत आहेत.
'आई तुळजाभवानी' मालिकेत साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन होणार आहे.
भक्तीची शक्ती, देवी आईचे मातृत्व आणि दैवी रूपाची दिव्यता यांचा अनोखा भव्य संगम मालिकेत पाहायला मिळणार.
कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' (Aai Tuljabhavani ) मालिकेतून प्रेक्षकांना घरबसल्या भक्तीचा प्रवास करता येत आहे. मालिकेत देवी आईचा अपरंपार भक्ती या नवरात्रीत पाहायला मिळत आहे. तसेच देवीची अनेक रुपांचे दर्शन मालितून घडत आहे. आई तुळजाभवानी देवी योगनिद्रेतून जागृत होण्याबरोबरच साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे.
भक्तांच्या रक्षणासाठी संकटांचा ऊर्जेने सामना करण्यासाठी आई तुळजाभवानी योगनिद्रेत गेल्यापासून देवीचे मानवी रूप असलेल्या छोट्या जगदंबेवर अनेक संकटं ओढवली. परंतु त्या इवल्याशा लेकराने आईच्या मार्गदर्शनाशिवाय तिच्या शिकवणुकीचा आधार घेऊन प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जात आपली शक्ती सिद्ध केली.
'आई तुळजाभवानी' मालिकेत आता तो क्षण आला आहे जेव्हा तुळजाई योगनिद्रेतून जागृत झाली असून जगदंबा आणि तुळजाईची अलौकिक भेट घडत आहे. प्रत्येक भक्ताला देवी आईच्या भेटी घडवून देणारा हा अनुभव आहे. हा अलौकिक क्षण जगत असताना प्रेक्षकांना आतुरता आहे ती म्हणजे साडेतीन शक्तिपीठांच्या दर्शनाची.
जगदंबाची आई गंगाईने साडेतीन शक्तिपीठांच्या देवींच्या दर्शनाचा ध्यास घेतला आहे. आई तुळजाभवानी, सप्तशृंगी माता, रेणुका माता, आई अंबाबाई यांचे भूतालावर आगमन यांचे दर्शन लवकरच घडणार आहे. नवरात्रीत या अलौकिक अनुभूती प्रेक्षकांसाठी नक्कीच अविस्मरणीय ठरेल. भक्तीची शक्ती, देवी आईचे मातृत्व आणि दैवी रूपाची दिव्यता यांचा अनोखा भव्य संगम प्रेक्षकांना रोज पाहायला मिळत आहे.'आई तुळजाभवानी' मालिका कलर्स मराठी वाहिनीवर रात्री 9.00 वाजता पाहायला मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.