Bigg Boss 18 canva
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: बिग बॉस बघणार घरातील सदस्यांचं भविष्य; आता होणार जबरदस्त तांडव..

Bigg Boss 18 New Promo: बिग बॉसच्या १८व्या सिझनला लवकरचं सुरुवात होणार आहे. बिग बॉसच्या नव्या सिझनमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.

Saam Tv

कलर्सवरील सुप्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस' अनेक प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. काही दिवसांपासून कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी'ची हवा सर्वत्र दिसत आहे. अभिनेता रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी ५' पहिल्यांदाच होस्ट करत आहे. रितेशच्या होस्टिंगला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय. पण बिग बॉस म्हटलं की सर्वांच्या डोक्यात येतं ते बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचं जबरदस्त होस्टींग. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान बिग बॉसचं होस्टिंग करतांना दिसतो. सलमानने बिग बॉसच्या घरातील अनेक सदस्यांची शाळा घेतली आहे.

बिग बॉस सीझन १८ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसच्या या सिझनसाठी अनेक चाहते उत्सुकत आहेत. बिग बॉस १८चा नविन प्रोमो प्रदर्शित झाला होता. बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. बिग बॉसचा नवा सिझन नक्कीच प्रेक्षकांच मनोरंजन करतील आणि घरातील सदस्यांना प्रभावित करतील.

बिग बॉसच्या नव्या सिझनमध्ये नविन थीम आणि नविन गेम प्लॅन पाहायला मिळणार आहे. घरातील नव्या ट्विस्टमुळे सदस्यांसाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो रिलीज झाल्यापासून त्याची OTT वर चर्चा सुरु आहे. काही दिवसापूर्वी बिग बॉस १८ची होस्टींग सलमान खान करणार नाही अशा चर्चा सर्वत्र सुरु होत्या. मात्र त्या चर्चांना आता बिग बॉसच्या टीमने खोडून काढले आहे. प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमध्ये सलमानच्या अस्तित्वाचा पुरावा चाहत्यांना दिला आहे. १६ सप्टेंबर रोजी बिग बॉस १८चा नवा प्रोमो त्यांच्या आधिकृत आकाऊंटवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना नविन थीम आणि नविन ट्विस्टचा इशारा मिळत आहे. "मनेरंजनाची इच्छा पूर्ण हेणार, जेव्हा काळाचा तांडव बिग बॉसच्या घारात नवा ट्विस्ट आणणार. तुम्ही सीझन बिग बॉसच्या १८व्या सिझनसाठी तयार आहात का?" असा त्या पोस्टला कॅप्शन देण्यात आला आहे. प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात कोणते नवे सदस्य सहभागी होणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Protest : नेपाळ पेटलं! माजी मंत्र्याचे घर पेटवलं, राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत

Vande Bharat Ticket Price: मुंबई, नागपूर, दिल्ली ते चेन्नई, वंदे भारत ट्रेनचं तिकीट किती? वाचा सविस्तर

Maratha Reservation: मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची मनोज जरांगेवर टीका, म्हणाले... VIDEO

5 स्टार रेटिंग असलेली कार १ लाखांनी स्वस्त, Nissan Magnite कारची नवीन किंमत किती?

Lonar News : जमिनीवर योग व आयुर्वेद हॉस्पिटल बांधण्याचा घाट; शेतीच्या बांधावरच शेतकऱ्याचे उपोषण

SCROLL FOR NEXT