सप्टेंबरच्या या लॉंग विकेंडला अनेक चित्रपट आणि वेबसिरीज पाहून तुम्ही टाइम स्पेंड करु शकता. प्रत्येक चित्रपटात एक वेगळेपण आहे. अनेक स्टार अॅक्टर्सनी यात मुख्य भुमिका बजावली आहे.या आठवड्यात येणाऱ्या चित्रपट आणि वेबसिरीजत सगळ्याचं प्रकारच्या जॉनरचे असणार आहेत. थ्रिलर,सस्पेन्स, रोमॅंटीक , क्राइम, अॅक्शन, कॉमेडी अशा पद्धतीचे सिनेमे पाहून तुम्ही विकेंड मस्त इंजॉय करू शकता. याची यादी पुढील प्रमाणे आहे.
विक्की कौशलचा 'Bad News' हा चित्रपट तु्म्ही या विकेंडला पाहू शकता. यात विक्की कौशल, तृप्ती डिमरी आणि अॅमी वर्क हे तिघे मुख्य भुमिकेत असणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे. या चित्रपटात एका गंभीर विषयाला कॉमेडी स्टाइल मांडले आहे. हा चित्रपट तु्म्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. याची बॉक्स ऑफिसची कमाई ७६.७ करोड इतकी झाली आहे.
बॉलिवूड स्टार आणि संगीतकार अपारशक्ती याचा 'बर्लिन' चित्रपट नुकताच Ottवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात नवी दिल्लीच्या राजकारणाचे वातावरण दाखवण्यात आले आहे. तसेच क्राइम स्टोरी सुद्धा यात असणार आहे. यात मुख्य भुमिकेत अपारशक्ती खुराना असणार आहे. तसेच राहुल बोस, अनुप्रिया गोयनका आणि कबीर बेडी ही धमाल करणारी कास्टींग असणार आहे. हा चित्रपट तुम्ही ZEE5वर पाहू शकता.
बॉलिवूडचे स्टार्स विक्रम मेस्सी, दिपक डोबरियाल आणि अंकुश खुराना यांनी Sector 36 चित्रपटाचे मुख्य भुमिका साकारणारे कलाकार आहेत. या तिघांनी मिळून या चित्रपटात धुमाकुळ घातला आहे. हा चित्रपट तुम्ही Netflix वर पाहू शकता.
स्कॉट वेस्टरफेल्डच्या तरुणांसाठी प्रसिद्ध कांदबरीचे रुपांतर अग्लीज या चित्रपटात केले आहे. यात तरुणांच्या मते सुंदरता काय आहे?, सुंदरतेचे महत्व काय? हे सांगण्यात आले आहे. हा चित्रपट तुम्ही Netflix वर पाहू शकता
ऑफिसर ब्लॅक बेल्ड हा एक कोरियन चित्रपट आहे. हा चित्रपट मार्शल आर्टिस्टवर आधारात आहे. यात कोरियन अभिनेता किम वू- बिन याने मुख्य भुमिका साकारली आहे. हा चित्रपट तुम्ही Netflix वर पाहू शकता.
थलावन हा चित्रपट रिअॅलिटी चेक दाखवणारा आहे. हा मल्याळम भाषेतला चित्रपट आहे. तसेच यात क्राइम थ्रिलर अशा दोन्ही जॉनरचा हा चित्रपट आहे. तो तुम्ही सोनी लिव्हवर पाहू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.