Bhagya Dile Tu Mala Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhagya Dile Tu Mala: मोहितेंच्या घरी 'कुणी तरी येणार येणार गं', राज-कावेरी गुड न्यूज देणार

Bhagya Dile Tu Mala Serial: राज आणि कावेरीच्या प्रवासाला नवे वळण मिळणार आहे. हे कपल गुड न्यूज देणार असून मोहितेंच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला आहे.

Priya More

Bhagya Dile Tu Mala Latest Episode:

कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' (Bhagya Dile Tu Mala Serial) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दिवसेंदिवस या मालिकेमध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहेत. या मालिकेतील राज आणि कावेरीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. राज आणि कावेरीच्या आयुष्यातील नवनवीन घडामोडी सर्वांना आवडताना दिसत आहेत.

आता राज आणि कावेरीच्या प्रवासाला नवे वळण मिळणार आहे. हे कपल गुड न्यूज देणार असून मोहितेंच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला आहे. १८ फेब्रुवारी 'भाग्य दिले तू मला' या मालिकेचा २ तासांचा विशेष भाग रंगणार आहे. त्यामुळे हा रविवार प्रेक्षकांसाठी खूपच मनोरंजक ठरणार आहे.

कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' या लोकप्रिय मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी जोडी एक गोड बातमी घेऊन येत आहे. रत्नमाला, राज, कावेरी यांच्या नव्या प्रवासात आता आणखी एक नवं वळण येणार आहे. ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला. राज कावेरी आई-बाबा होणार आहेत. मोहिते कुटुंबात नवा सदस्य सहभागी होणार. ही बातमी प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. ही प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहेच.

या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांना प्रश्नात पाडले आहेत. या प्रोमोमध्ये कावेरी राजला गुड न्यूज सांगण्यासाठी कॉल करते पण राज फोन बंद करून किमयाकडे देतो. आता कावेरी ही गुड न्युज राजला कशी सांगेल? हे पाहण्यासाठी तुम्हाला 'भाग्य दिले तू मला'चा २ तासांचा विशेष भाग पाहावा लागणार आहे. येत्या १८ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता तुम्हाला कलर्स मराठीवर हा एपिसोड पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे ३६१ आमदारांचा निधी रखडला; सरकारी तिजोरीवर ताण; VIDEO

Gopichand Padalkar : जयंत्या, जातीवंत पाटील असशील तर...; गोपीचंद पडळकर पुन्हा घसरले

CMF Headphones Pro: 100 तास प्लेबॅकसह नवीन CMF वायरलेस हेडफोन लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर उजडला, लाडकीला सप्टेंबरचे ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख समोर

SCROLL FOR NEXT