New Marathi Serial Video saam tv
मनोरंजन बातम्या

New Marathi Serial Video : "तुझी सावली तुझ्यासोबत आहे..."; प्रेक्षकांच्या भेटीला येतेय नवीन मालिका, मुख्य भूमिकेत झळकणार 'हे' कलाकार

New Marathi Serial Promo Out : नव्याकोऱ्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात टिव्ही इंडस्ट्रीतील खूप मोठे कलाकार पाहायला मिळणार आहे. मालिकेचे नाव आणि रिलीज अपडेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रेक्षकांच्या भेटीला नवीन मालिका येत आहे.

नवीन मालिकेचा प्रोमो 'कलर्स मराठी' वाहिनीने शेअर केला आहे.

नवीन मालिकेत तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे.

प्रेक्षकांच्या भेटीला नवीकोरी मालिका येणार आहे. मालिकेचा खास प्रोमो समोर आला आहे. मालिकेत खूपच तगडी स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. नवीन मालिका 'कलर्स मराठी' वाहिनीवर सुरू होणार आहे. मालिकेच्या पहिल्याच प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'कलर्स मराठी'चा टीआरपी आधीच 'बिग बॉस मराठी 6' मुळे उंचावला आहे. आता ही मालिका त्यात भर घालणार असल्याचे दिसत आहे.

'कलर्स मराठी' वाहिनीवर सुरू होणाऱ्या मालिकेच नाव 'मी जिंकून घेईन सारं!' असे आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. या मालिकेत मराठी अभिनेत्री जान्हवी तांबट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मालिकेतील तिच्या पात्राचे नाव छवी आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहे. मालिकेत भारती आचरेकर या आजीच्या भूमिकेत दिसणार आहे.तसेच मालिकेत दोन हिरो पाहायला मिळणार आहेत. एक अभिनेता अमित रेखी आणि दुसरा संचित चौधरी... अभिनेत्री अमृता फडके ही खलनायिकेच्या रुपात पाहायला मिळणार आहे.

मालिकेच्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, छवी आपल्या आजीला बोलते की, "तुझी सावली तुझ्यासोबत आहे..." त्यामुळे मालिकेत आजी-नातीची हटके जोडी पाहायला मिळणार आहे. व्हिडीओच्या प्रोमोला कॅप्शन लिहिलं की, "कितीही येऊ दे अडचणींचं वारं, छवी नेहमीच म्हणते 'मी जिंकून घेईन सारं'!" या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहे.

यापूर्वी जान्हवी तांबटने 'लक्ष्मी निवास', 'अबोल प्रितीची अजब कहाणी' या मालिकेत काम केले आहे.अमित रेखीने 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत काम केले आहे. तर 'तुझी माझी जमली जोडी' या मालिकेत संचित चौधरी झळकलेला. अमृता याआधी 'प्रेमास रंग यावे' मालिकेत झळकली होती. प्रोमोमुळे प्रेक्षक मालिका पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. मात्र अद्याप मालिकेची रिलीज डेट आणि वेळ जाहीर झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT