Marathi Serial: 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत नवा ट्विस्ट; 'मन धावतंया'फेम राधिका भिडेची होणार एन्ट्री

savalyachi janu savali: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका सावळ्याची जणू सावली मध्ये पुढील भागात नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नवीन प्रोमोमध्ये दिसते की सावली आणि सारंगच्या जोडीत गोडवा वाढताना दिसत आहे.
savalyachi janu savali
savalyachi janu savaliSaam Tv
Published On

Marathi Serial: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका सावळ्याची जणू सावली मध्ये पुढील भागात नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यांच्या लाडक्या सावली आणि सारंग यांची आयुष्यात काय घडणार हे पाहायला त्यांना आवडत आहे.

नवीन प्रोमोमध्ये दिसते की सावली आणि सारंगची जोडीत गोडवा वाढला आहे. सावली सारंग समोर सरप्राइजबद्दल विचारते आणि तिथेच राधिका भिडे अचानक येते. यामुळे सावली खूपच खुश होते. राधिकाची एन्ट्री झाल्याने मालिकेत नविन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

savalyachi janu savali
Bigg Boss Marathi 6: 'तुला शिव्यांची सवय आहे, मला नाही...'; प्राजक्ता-अनुश्रीची कॅट फाईट, प्रोमो व्हायरल

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की सावली आणि राधिका एकत्र गाणं रेकॉर्ड करण्याची तयारी करत आहेत. दरम्यान, भैरवीचा एक कटही उघड होतो. ती सावलीचं गाणं खराब करण्याचा प्लॅन फोनद्वारे साऊंड रेकॉर्डिस्टला सांगताना दिसते, जे भैरवी कोणत्या हेतूने असे वागते हे दाखवते. भैरवीचा हा कट नवा तणाव आणू शकते.

savalyachi janu savali
Actress Fraud Case: प्रसिद्ध अभिनेत्रीवर ११.५ कोटींच्या फसवणुकीचा आरोप; मुंबई पोलिसांनी केला गुन्हा दाखल

सावळ्याची जणू सावली ही मालिका आता प्रेक्षकांना नवनवीन ट्विस्ट आणि कटद्वारे कसे मनोरंजन करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. तसेच येत्या काळात मालिकेत राधिकाची भूमिका आणि भैरवीचा कट कथानकाला आणखी कसदार बनवेल की नाही हे लवकरच कळेल. त्यासाठी ही मालिका झी मराठी वाहिनीवर सायंकाळी ६.३० वाजता पहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com