Citadel Best Web Series Instagram/ @priyankachopra
मनोरंजन बातम्या

Citadel Best Web Series: प्रियंकाची ‘सिटाडेल’ रिलीज होताच ठरली अव्वल; ‘या’ गाजलेल्या वेबसिरिजना मागे टाकत ठरली हिट....

Priyanka Chopra New Web Series: प्रियांकाची ‘सिटाडेल’ ही वेबसीरिज ‘ॲमेझोन प्राईम व्हिडीओ’ वर प्रदर्शित झाली आहे. प्रदर्शित होताच वेबसीरिजने नवा विक्रम केला आहे.

Chetan Bodke

Citadel Web Series: अभिनेत्री प्रियंका चोप्रा - जोनास नेहमीच आपल्या अभिनयामुळे प्रसिध्द आहे. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही प्रियांकाने आपल्या अभिनयाची चमक दाखवली. सध्या प्रियंका आपल्या आगामी वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमध्ये प्रियंका मुख्य भूमिकेत असून पुन्हा एकदा तिच्या अभिनयाची चर्चा होते. प्रियांकाची ही वेबसीरिज ‘ॲमेझोन प्राईम व्हिडीओ’ वर प्रदर्शित झाली आहे. प्रदर्शित होताच वेबसीरिजने नवा विक्रम केला आहे.

वेब सीरिजची घोषणा झाल्यापासून या वेबसीरिजची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. धडाकेबाज लूकमध्ये दिसणाऱ्या प्रियांकाने या वेब सीरिज उत्तम अभिनय करण्याचा प्रयत्न केला. धमाकेदार ॲक्शन, थरार आणि रोमान्सने परिपूर्ण असणाऱ्या या वेब सिरीजची कथा, कलाकारांची ॲक्शन सीन्स, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास यशस्वी होत आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे या वेब सीरिजने अनेक प्रसिद्ध वेब सीरिजला मागे टाकलंय. (Hollywood)

अमेरिकेतील व्हिओडी- ट्रॅकिंग वेबसाइटच्या अहवालानुसार, प्रेक्षकांनी ‘सिटाडेल’ या वेब सीरिजला भरघोस प्रतिसाद दिल्यामुळे ही वेब सीरिज जगातील सर्वात लोकप्रिय वेब सीरिजच्या यादीत सामील झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या वेब सीरिजने ‘सक्सेशन’ आणि ‘द मंडलोरियन’ सारख्या दमदार आणि हिट वेब सीरिजला मागे टाकलंय. (OTT)

शुक्रवारी म्हणजेच २८ एप्रिलला या सीरिजचे पहिले दोन भाग प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाले. हे दोन भाग प्रदर्शित होताच वेब सीरिजवर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. जरीही प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या असल्या तरीही आज टॉप ट्रेंडिंग वेब सीरिजच्या यादीत ‘सिटाडेल’ पहिल्या क्रमांकावर आहे.

वेब सीरिजमध्ये प्रियांकासोबत, स्टेनली टुकी आणि लेस्ली मॅनव्हिलसारख्या कलाकारांसह रिचर्ड मॅडन यासारखे सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. रुसो ब्रदर्स AGBO आणि शो-रनर डेव्हिड वील यांनी या वेबसीरिजची निर्मिती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anagha Atul: भरपावसात साडी नेसून अनघा अतुलचं बोल्ड फोटोशूट, Photos

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

Pune PMC News : पुण्यातील नामांकित 'जोशी' पुलावर घाणीचे साम्राज्य, महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

Healthy liver color: निरोगी लिव्हरचा रंग कसा असतो?

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार! चेंबूरमध्ये पालिका रुग्णालयाबाहेर ४ फुटांपर्यंत पाणी, रुग्णांना खांद्यावरून नेण्याची वेळ; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT