TDM Film Injustice: मराठी चित्रपटांवर होतोय अन्याय; थिएटर मिळत नाहीत मराठी माणसं गेली कुठं?

भाऊराव कऱ्हाडेंचा नवीन चित्रपट TDM प्रदर्शित झालाय. बहुतांश ठिकाणी चित्रपटाचे शोज कॅन्सल करतायेत. मराठी चित्रपटाबाबतचा हा अन्याय चीड आणणारा आहे.
TDM Film Injustice In Maharashtra
TDM Film Injustice In MaharashtraInstagram

TDM Film Injustice In Maharashtra: मराठी चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरतो. अनेक मराठी चित्रपट सध्या थिएटरमध्ये दिलासादायक कमाई करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. २८ एप्रिलला ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘टीडीएम’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई करत असून ‘टीडीएम’नेही महाराष्ट्रात आपली एक वेगळीच क्रेझ निर्माण केली आहे. जरी चित्रपटाची चर्चा सर्वत्र जोमात सुरू असली तरी, ‘टीडीएम’ चित्रपटाच्या टीमला मात्र एका वेगळ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

TDM Film Injustice In Maharashtra
धक्कादायक... थिएटर मालकांना वरून प्रेशर असल्याने 'TDM' चित्रपटाला शो दिले नाही... मराठी सिनेमाची निव्वळ गळचेपी

नुकतच सोशल मीडियाच्या माध्यमातून लेखक हरी नरके यांनी ‘टीडीएम’ चित्रपटाला होत असलेल्या मनस्तापाबद्दल ट्विट केले आहे. ते म्हणतात, भाऊराव कऱ्हाडेंचा नवीन चित्रपट TDM प्रदर्शित झालाय. चित्रपट जिथं जिथं प्रदर्शित झालाय, तिथंतिथं चांगलं ओपनिंग आलंय.पण बहुतांश ठिकाणाहून टीडीएमचे शोज कॅन्सल करतायेत. किंवा प्राईमटाइम देत नाहीत.मराठी चित्रपटाबाबतचा हा अन्याय चीड आणणारा आहे.

हा भेदभाव,पक्षपात मराठी निषेधार्ह आहे.-भाऊराव गुणी दिग्दर्शक आहेत.त्यांचे ख्वाडा आणि बबन हे चित्रपट चांगले चालले होते.तिसरा सिनेमा लागोपाठ त्यांना काढता आला.त्यांच्या पहिल्या सिनेमानंतर त्यांना पुरस्कार देऊन आम्ही मित्रांनी गौरवले होते.त्यांच्याकडून खूप अपेक्षा असल्याचे व त्यांची एन्ट्री दमदार असल्याचे मी जाहीरपणे बोललो होतो.  (Entertainment News)

आता त्यांना थिएटर मिळत नाहीत तेव्हा कुठे आहेत मराठीवाले?असा एकाने प्रश्न केलाय.या लढाईत सर्वांनी उतरायला हवे.पण एरवी हे मराठी रंगकर्मी,निर्माते, दिग्दर्शक,कलाकार (अपवाद वगळता) मराठीच्या व्यापक लढाईत कधीच फिरकत नाहीत.स्वतःवर अन्याय झाल्यावर मराठी आठवते.

मराठी भाषा, साहित्य, वाचन संस्कृती, शाळा, ग्रंथव्यवहार यात आपणही सहभाग दिला पाहिजे ही जाणीव यानिमित्ताने या मंडळींना होवो आणि मराठी चित्रपटांना मध्यवर्ती थिएटर्स मिळोत, प्राईम टाईम मिळो हीच सदिच्छा. आम्ही सोबत आहोत. (Marathi Film)

TDM Film Injustice In Maharashtra
Salman Khan Death Threats: मुंबईपेक्षा दुबईत मला जास्त सुरक्षित वाटतं... सलमान खानच्या प्रतिक्रियेमुळे वाद होण्याची शक्यता

चित्रपटाबाबत आज कलाकारांआधीच प्रेक्षकांनीच पुढाकार घेत शो का नाहीत अशी विचारणा केली. या संपूर्ण चित्रावर 'टीडीएम' चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांना अश्रू अनावर झालेत. यावेळी बोलताना भाऊराव म्हणतात, “आज 'टीडीएम' चित्रपट लोकांना आवडतोय आणि लोक हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त ही करतायत मात्र चित्रपटगृहात शो नसल्याकारणास्तव मराठी प्रेक्षकांवर आणि आम्हा सर्व कलाकारांवर हा अन्याय होतोय. मला कुठेतरी वाटतंय की हे सर्व चित्र पाहून मराठी सिनेमा संपतोय, किंवा संपवला जातोय. ” (Marathi Actors)

२८ एप्रिल २०२३ रोजी हा सिनेमा संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. आज चित्रपटाचे प्रमोशन करताना चित्रपटगृहात प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असताना, चित्रपटगृहात आपल्या चित्रपटाला शोच नाहीत ही बाब लक्षात येता या विषयावर दोन शब्द मत मांडणाऱ्या 'टीडीएम' चित्रपटातील कलाकारांचा उर भरून आला. आज मराठी चित्रपटांना योग्य तो न्याय मिळावा, यासाठी आपण सर्वांनीच कलाकारांच्या, निर्मात्यांच्या, दिग्दर्शकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं ही आपली जबाबदारी समजूया.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com