Trailer Can Be Seen In Theaters Saam Tv
मनोरंजन बातम्या

Watch Any Trailer In 1 Rs: खरंच ? कोणताही ट्रेलर पहा फक्त १ रूपयात; पीव्हीआर आयनॉक्सची सिने रसिकांसाठी अनोखी भेट

Chetan Bodke

Trailer Can Be Seen In Theaters: चित्रपटाचा ट्रेलर पाहणे हा एक रोमांचक आणि आनंददायी असा अनुभव असतो. यामधून चित्रपटाची कथा, भूमिका आणि एकदंर अंदाज घेता येतो, यामुळे रसिकांमध्ये येणार्‍या चित्रपटाची उत्सुकता निर्माण होत असते. हीच गोष्ट लक्षात घेत भारतातील आघाडीच्या फिल्म एक्झिबिटर असलेल्या पीव्हीआर आयनॉक्स तर्फे जगातील पहिला क्युरेटेड ट्रेलर स्क्रीनिंग शो मोठ्या पडद्यावर केवळ १ रूपयांत सादर करण्यात आला आहे.

३० मिनिटांच्या स्क्रीनिंगमध्ये आगामी बॉलीवूड, हॉलीवूड आणि प्रादेशिक चित्रपटांचे १० पेक्षा अधिक ट्रेलर दाखविण्यात येणार आहेत. या स्क्रीनिंग दरम्यान दर्शकांना अद्वितीय व अभूतपूर्व आशयाचा अनुभव घेता येणार आहे.

नाविन्यपूर्ण, अभिनव आणि आकर्षक आशयाच्या वाढत्या मागणीसह, ३० मिनिटांचा ट्रेलर शो चित्रपट रसिकांना अनोख्या मनोरंजनाची एक उत्तम संधी देईल. अस्सल सिने रसिकांसाठी हे एक वेगळा अनुभव प्रदान करेल. नवीन ट्रेलर शो ७ एप्रिलपासून देशभरातील पीव्हीआर आणि आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित करण्यात आला असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

नवीन शो सादर करताना पीव्हीआर आयनॉक्सचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्ता म्हणाले की, उच्च दर्जाची ध्वनी व्यवस्था आणि दृकश्राव्य अनुभवामुळे मोठ्या पडद्यावर ट्रेलर पाहण्याचा अनुभव रोमांचकारी बनतो आणि चित्रपटाविषयीच्या उत्सुकतेत आणि चित्रपट पाहण्याच्या उत्कंठेत मोलाची भर पाडणारा असतो.

या ३० मिनिटांच्या ट्रेलर स्क्रीनिंग शो च्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी मोठ्या पडद्यावर आटोपशीर, उत्कृष्ट अनुभव देणारे मनोरंजन आणि ते सुद्धा केवळ एक रुपया इतक्या कमी किंमतीत देऊ करीत आहोत. आपल्या आवडत्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरचा आनंद जलदरित्या व आरामदायी आसनांवर आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांसह प्रेक्षक घेऊ शकणार आहेत.

त्याबरोबरच यासाठी प्रेक्षकांना कोणते ही जास्त शुल्क द्यावे लागणार नाही. आम्ही हा आगळावेगळा असा अनुभव घेण्यासाठी संपूर्ण देशभरातील सिने रसिकांना आमच्या चित्रपटगृहात आमंत्रित करू इच्छित आहोत.

पीव्हीआर आणि आयनॉक्स नेहमीच अभिनवतेमध्ये अग्रस्थानी राहिले असून चित्रपट पाहण्याचा अनुभव आनंददायी करण्यासाठी सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आनंददायी अनुभव देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या नवीन शो च्या सादरीकरणासह मल्टिप्लेक्स चेनचे उद्दिष्ट आपल्या दर्शकांना एक अद्वितीय चित्रपट अनुभव प्रदान करणे आणि मोठ्या पडद्यावरील मनोरंजन पाहण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे हे आहे. ट्रेलर शो सर्व प्रमुख चित्रपटगृहात प्राईम टाईम स्लॉटमध्ये दाखविण्यात येणार आहे.

आपल्या जवळच्या पीव्हीआर आणि आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये पहिला ३० मिनिटांचा ट्रेलर शो पाहा. बॉक्स ऑफिस किंवा पीव्हीआर आणि आयनॉक्सचे संकेतस्थळ किंवा अ‍ॅपद्वारे सिनेरसिक तिकीटे खरेदी करू शकतात. शो बद्दल अधिक माहितीसाठी आणि तिकीटे बुक करण्यासाठी पीव्हीआर किंवा आयनॉक्सचे संकेतस्थळ किंवा अ‍ॅपला भेट द्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT