टेलिव्हिजनवरील अशा मोजक्याच मालिका आहेत की ज्या गेले कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यातीलच एक सीरीयल म्हणजे, ‘सीआयडी’. या मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकार सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत राहतात. या मालिकेमध्ये, इन्स्पेक्टर अभिजीतचे पात्र साकारलेल्या आदित्य श्रीवास्तव यांनी देशभरातल्या चाहत्यांमध्ये स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आपल्या अभिनयापलिकडे जाऊन प्रेक्षकांच्या मनामनात स्वत:ची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. इन्स्पेक्टर अभिजीत साकारणाऱ्या अभिनेता आदित्य श्रीवास्तवचा आज ५६ वा वाढदिवस आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये जन्मलेल्या आदित्य श्रीवास्तव यांचा आज (२१ जुलै) त्याचा ५६ वा वाढदिवस आहे. आदित्यने आपल्या अभिनयाची चमक फक्त टीव्ही इंडस्ट्रीमध्येच नाही तर, चित्रपटातूनही प्रेक्षकांना चमक दाखवली आहे. परंतु, आदित्य यांना त्यांचे चाहते आदित्य या नावाने नाही तर, रील लाईफ कॅरेक्टर म्हणूनच चांगले ओळखतात. आदित्य अगदी सामान्य कुटुंबातील असून त्याच्या वडीलांची बँकेमध्ये नोकरी होती. आदित्यचे अलाहाबाद विद्यापीठातून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो थिएटरकडे वळाला.
आदित्यने करिअरच्या सुरुवातीच्या काळात रंगभूमीवरही अभिनय केला आहे. त्याशिवाय त्याने टीव्हीवर आणि चित्रपटातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आदित्यला सर्वाधिक ओळख अभिजित नावानेच ओळख मिळाली आहे. आदित्यला विशेष ओळख ‘सीआयडी’नेच दिली. सीआयडी संपल्यानंतर आदित्यने हृतिक रोशनच्या ‘सुपर-३०’ चित्रपटामध्ये लल्लन सिंह नावाची भूमिका साकारली होती. पण त्यानंतर तो कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही.
आदित्यने शेखर कपूरच्या ‘बँडिट क्वीन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले होते. त्यानंतर आदित्यला १९९८ मध्ये ‘सीआयडी’ची ऑफर मिळाली. या सीरीयलने अभिनेत्याच्या करियरला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. ‘सीआयडी’ ही सिरीयल १९९८ पासून टीव्हीवर टेलिकास्ट होत आहे. 'सुपर-३०'आधी आदित्यला 'बँडेड क्वीन', 'सत्या', 'दिल से', 'साथिया', 'लक्ष्य', 'ब्लॅक फ्रायडे', 'गुलाल' आणि 'मोहनदास' या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
तर, टीव्ही सीरीयल इंडस्ट्रीमध्ये, सीआयडीच्या शिवाय, 'रात होने को है', 'अदालत', 'रिश्ते', 'स्टार सेलर', '९ मालाबार हिल', 'ये शादी नहीं हो सकती', 'व्योमकेश बक्शी' आणि 'कवी कालिदास' सारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.