Geeta Kapur SAAM TV
मनोरंजन बातम्या

Geeta Kapur : 'गीता माँ'नं बॉलिवूडला ठोकला रामराम, नेमकं कारण काय?

Choreographer Geeta Kapur Quits Bollywood : कोरिओग्राफर गीता कपूरने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. तिने बॉलिवूड सोडले आहे. या मागचे नेमकं कारण, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

कोरिओग्राफर गीता कपूर (Geeta Kapur) कायम तिच्या डान्समुळे चर्चेत असते. तिच्या डान्सचे चाहते दिवाने आहेत. मात्र आता मात्र 'गीता माँ' एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. गीता कपूरने बॉलिवूड सोडले आहे. याचा खुलासा नुक्त्याचा झालेल्या एका मुलाखतीत गीता कपूरने केला आहे.

एका मिडिया मुलाखतीत गीता कपूरला विचारण्यात आले की, "तुम्ही पुन्हा बॉलिवूडमध्ये कधी दिसणार?" त्यावर उत्तर देत 'गीता माँ' म्हणाली की, नाही. मला असे वाटते की प्रत्येकाने एक पाऊल मागे येऊन नवीन कलाकारांना पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे. आता दुसऱ्यांनी करिअरमध्ये पुढे जायची वेळ आली आहे. या इंडस्ट्रीतून काम, पैसा आणि प्रसिद्धी आणि आशीर्वाद सर्व काही मिळाले आहे. त्यामुळे जेव्हा मला एखादी आलेली संधी सोडावी वाटणार नाही तेव्हाच मी बॉलिवूडमध्ये पुन्हा येईन. नाहीतर मी पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार नाही."

गीता कपूर पुढे म्हणाली की, "सध्या इंडस्ट्रीत कामाची कमतरता आहे. त्यामुळे नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे. आमच्या काळात बनायचे तसे चित्रपट आता बनत नाही. आमच्या वेळच्या चित्रपटात 8-10 गाणी असायची. त्यावर सुंदर डान्स असायचा. त्यामुळे दुसऱ्यांचे काम घेऊन त्यांना संधी न देणे माझ्या मते चुकीचे ठरेल. मला कोणत्याही बंधनात काम न करता क्रिएटिव्ह पद्धतीने काम करायचे आहे."

गीता कपूर वर्कफ्रंट

गीता कपूरने आजवर अनेक सुंदर गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. तिच्या स्टाइलचे चाहते दिवाने आहेत. बॉलिवूडमध्ये तिला सर्वजण 'गीता माँ' म्हणून ओळखतात. ती डान्स रिअॅलिटी शोची जज देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jagdeep Dhankhar Resign : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, राज्यसभा अध्यक्षांची जागा कोण घेणार? वाचा नियम

Ladki Bahin Yojana: ₹१५०० कायमचे बंद, राज्यातील १० लाख लाडकीचे अर्ज बाद, यादीत तुमचेही नाव नाही ना?

Shocking: १३ वर्षांच्या मुलीचं अपहरण, ३ दिवस घरात डांबून ठेवत बलात्कार, VIDEO बनवत...

Horoscope Tuesday Update : जोडीदाराचे म्हणणे आज ऐकाचं, धनलाभ होईल; वाचा आजचे राशीभविष्य

डान्स तर असा की... खुद्द नोराही खुश झाली असती; पाहा तरुणाचा भन्नाट व्हिडिओ

SCROLL FOR NEXT