Gharoghari Matichya Chuli New Marathi TV Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

New Marathi TV Serial: गोंडस अन् गोड, ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये दिसणार बालकलाकार आरोही सांबरे

Gharoghari Matichya Chuli: स्टार प्रवाहवर १८ मार्चपासून सुरु होणाऱ्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

साम टिव्ही ब्युरो

Gharoghari Matichya Chuli:

स्टार प्रवाहवर १८ मार्चपासून सुरु होणाऱ्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोना भरभरुन प्रतिसाद मिळत असून मुख्य नायिका जानकीसोबत प्रोमोत दिसणारी छोटी मुलगी कोण आहे याविषयी देखिल प्रेक्षकांमध्ये कुतुहल आहे.

प्रोमोत दिसणारी ही चिमुकली म्हणजेच बालकलाकार आरोही सांबरे. घरोघरी मातीच्या चुली मालिकेत आरोही ओवीच्या भूमिकेत दिसेल. याआधी आरोही स्टार प्रवाहच्या मुलगी झाली हो, शुभविवाह आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून भेटीला आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोहीला अभिनयासोबतच नृत्याची आणि गाण्याची देखिल आवड आहे. यासोबतच आरोही बॉक्सिंग आणि कराटेचं देखिल प्रशिक्षण घेत आहे. घरोघरी मातीच्या चुली मालिकेतली ओवी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ती खुपच उत्सुक आहे.  (Latest Marathi News)

मालिकेच्या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हण्टलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे अशी दिग्गज कलाकार मंडळी या मालिकेतून भेटीला येणार आहेत.

स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली असून राहुल लिंगायत मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

SCROLL FOR NEXT