Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Snake Smuggling Racket Busted In Wardha: हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे सापांची तस्करी करणाऱ्या ४ जणांना अटक करण्यात आलीय. सापांची परदेशात तस्करी केली जातेय का असा तपास केला जातोय.
Snake Smuggling Racket Busted In Wardha
Forest department arrests four in Hinganghat, Wardha, seizing 13 rare snakes isaam tv
Published On

चेतन व्यास, साम प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील आजसरा येथे सापांची तस्करी करणाऱ्या ४ जणांना अटक करण्यात आलीय. वनविभागाने या चौघांकडून तब्बल १३ विविध प्रजातीचे साप जप्त केली आहेत. अटक केलेले आरोपी हे विविध जिल्ह्यातील रहिवासी आहेत. आरोपींकडून वनविभागाने जप्त केलेल्या सापांमध्ये अजगर, कोबरा, तस्कर, धामण, कवड्या अशा विविध प्रजातीच्या सापाचा सामावेश आहे.

परदेशात अजगर, कोब्रा यासारख्या विविध सापांची मोठी मागणी आहे. यामुळे हे सापांची परदेशात तस्करी करणारे रॅकेट तर नाहीये ना? या अंगानेही वनविभागाने तपास सुरू केलाय.

हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे काही तरुणांकडे मोठ्या संख्येने साप असल्याची माहिती वनविभागाच्या अधिका-यांना मिळाली. त्यानंतर उपवनसंरक्षक हरवीर सिंग यांच्या मार्गदर्शनात वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी यांनी कर्मचाऱ्यांसहा आजनसरा गाठले. वनविभागाच्या चमूने संकेत लखपती पाठक (वय 25) रा. लावा, जिल्हा - नागपूर, शशिकांत रमेश बागडे (वय 35) रा. सुयोटोला, जिल्हा- गोंदिया, रुपेश दिलीप गुप्ता (वय 29) रा. कोहळे ले-आऊट, जिल्हा - नागपूर, स्वप्नील गजानन काळे (वय 30) रा. वाडी, जिल्हा - नागपूर यांना ताब्यात घेतले.

Snake Smuggling Racket Busted In Wardha
Beed: सामाजिक कार्यकर्त्याचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गेला, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करत...

त्यांच्याजवळील साहित्याची पाहणी वनविभागाच्या अधिका-यांसह कर्मचा-यांनी केल्यावर मोठ्या संख्येने विषारी व बिनविषारी साप आढळले. या चारही व्यक्तींकडून वनविभागाच्या अधिका-यांनी 3 कोबरा, 2 तस्कर, 3 धामण, 2 अजगर, 1 कुकरी, 1 पानदीवड, कवड्या प्रजातीचा 1 असे एकूण 13 साप व कार, साप पकडण्याची स्टीक, 25 किलो तांदुळ असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वनविभागाने चारही आरोपींविरुद्ध वनगुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

परदेशांमध्ये सापांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अजगर, कोब्रा यांना बाहेर देशात मोठी मागणी आहे. शक्यता आहे की यांची परदेशात तस्करी होत असेल.त्या दृष्टीने सुद्धा तपास केले जातं आहे. जे आरोपी आहेत ते वेगवेगळ्या भागातले आहे. वर्धा जिल्ह्यातील साप पकडत त्याच बाहेर प्रदर्शन करत होते की काय.नेमकं काय प्रकार आहे याचा पूर्ण तपास सुरू आहे. चौकशीतून सत्य पुढे येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com