Chhatrapati Shivaji Maharaj Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे...; शिवजन्मोत्सवानिमित्त 'हे' चित्रपट नक्की पाहा

Chhatrapati Shivaji Maharaj Movie: शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक प्रेरणादायी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. शिवजी महाराजांच्या वैभवशाली इतिहास पुन्हा अनुभवायचा असेल तर हे पुढील पाच चित्रपट आवर्जून पाहा

Shruti Vilas Kadam

Chhatrapati Shivaji Maharaj: आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५वी जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात शिवोत्सव साजरा करण्यात येतो. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक प्रेरणादायी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आज शिवजी महाराजांच्या वैभवशाली इतिहास पुन्हा अनुभवायचा असेल तर हे पुढील पाच चित्रपट आवर्जून पाहा.

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा सामान्य माणसाच्या जीवनावर प्रभाव पडतो, स्वाभिमान आणि सामाजिक जबाबदारीची भावना जागृत करतो अशी एक समकालीन कथा दाखवण्यात आली आहे.

हिरकणी

प्रसाद ओक दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णी अभिनित हिरकणी या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील हिरकणी या धाडसी महिलेची हृदयस्पर्शी कहाणी दाखवणयुगात आली आहे. ही हिरकणी तिचे बाळ रात्री एकटं आहे या काळजीमुले सर्वात कठीण बुरुज उतरून आपल्या घरी जाते.

पावनखिंड

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंडच्या ऐतिहासिक लढाईचे आणि शिवाजी महाराजांच्या आदेशाखाली मराठ्यांनी दाखवलेल्या शौर्याचे चित्रण करणारा हा चित्रपट आहे. महाराज सुखरूप राहिले पाहिजेत या भावनेने मावळ्यांनी लादलेली लढाई या चित्रपटातून अनुभवता येते.

तान्हाजी: द अनसंग वॉरियर

अजय देवगण आणि काजोल अभिनित तसेच ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी हा चित्रपट सुभेदार तान्हाजी यांच्या सिंहगडाच्या लढाईवर आधारित एक उत्तम चित्रपट आहे. या चित्रपटातील शरद केळकर याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कौतुकास्पद होती.

छावा

नुकताच प्रदर्शित झालेला लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट खरं तर छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आहे. पण या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण अनुभवायला मिळतो. तसेच विकी कौशल आणि अक्षय खन्ना यांच्या उत्तम अभिनय पाहण्याची संधी या चित्रपटातून मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT