Chhaava Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava Box Office Collection: 'छावा' लवकरच रचणार नवा इतिहास, ५०० कोटींपासून काही पावले दूर

Chhaava Box Office Collection Day 21 : विकी कौशलचा 'छावा' चित्रपट काही दिवसांत ५०० कोटींचा व्यवसाय पूर्ण करणार आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

Shreya Maskar

'छावा' (Chhaava ) चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचे चाहते दिवाने झाले आहेत. त्याचा अभिनयाचे चित्रपटाला चार चाँद लागले आहे. तर दुसरीकडे चित्रपटात महाराणी येसूबाईची भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकली आहे. 'छावा' (Chhaava) चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे.

'छावा' चित्रपट 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला असून फक्त तीन दिवसांत चित्रपटाने बजेट वसूल केले आहे. 'छावा' चित्रपटातून लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे.

'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 21

  • 'छावा' पहिला दिवस 33.1 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 39.3 कोटी रुपये

  • तिसरा दिवस 48.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस 24 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 24.50 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 32 कोटी रुपये

  • सातवा दिवस 21.5 कोटी रुपये

  • आठवा दिवस 23 कोटी रुपये

  • नववा दिवस - 45 कोटी रुपये

  • दहावा दिवस - 40 कोटी रुपये

  • अकरावा दिवस - 19.10 कोटी रुपये

  • बारावा दिवस - 18.5 कोटी रुपये

  • तेरावा दिवस - 21.75 कोटी रुपये

  • चौदावा दिवस- 12 कोटी रुपये

  • पंधरावा दिवस - 400 कोटींचा टप्पा पार

  • सोळावा दिवस - 21 कोटी रुपये

  • सतरावा दिवस - 25 कोटी रुपये

  • अठरावा दिवस - 8.50 कोटी रुपये

  • एकोणिसावा दिवस - 5.50 कोटी रुपये

  • विसावा दिवस - 5.75 कोटी रुपये

  • एकवीस दिवस - 5.53 कोटी रुपये

  • एकूण - 483.58 कोटी रुपये

रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

'छावा' ने जगभरात 600 कोटींचा टप्पा पार केला असून बॉक्स ऑफिसवर 'छावा' लवकरच 500 कोटींचा टप्पा पार करणार आहे.'छावा'ला 500 कोटी पूर्ण करण्यासाठी आता फक्त 17 कोटी पाहिजे आहेत. 'छावा'ने रिलीजच्या 21व्या दिवशी 5.53 कोटींची कमाई करून पद्मावत आणि जवानचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

कलेक्शन किती?

मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोणच्या 'पद्मावत' चित्रपटाने 21व्या दिवशी 4.50 कोटी रुपये कमावले तर शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने 5.15 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता कधी येणार? आज होणार निर्णय, महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Cabinet Reshuffle: मोठी बातमी! दिवाळीआधी मोदी सरकारमध्ये मोठे फेरबदल, ५ नवीन शिलेदारांना मंत्रिमंडळात संधी

Fort : इतिहासप्रेमींसाठी खास ठिकाण! डोंगराच्या माथ्यावर वसलेल्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे 'हा' किल्ला

रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! जळगावसाठी धावणाऱ्या गरीब रथ, सेवाग्रामसह ५ गाड्यांचे मार्ग बदलले; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT