Mahesh Bhatt Video : हात धरून स्टेजवरून खाली उतरवलं; भर कार्यक्रमात अनुपम खेर यांच्याकडून महेश भट्ट यांचा अपमान?

Anupam kher Insulted Mahesh Bhatt : बॉलिवूडचे अभिनेते अनुपम खेर आणि चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात अनुपम खेर यांनी हात धरून महेश भट्ट यांना स्टेजवरून खाली उतरवले आहे.
Anupam kher Insulted Mahesh Bhatt
Mahesh Bhatt VideoSAAM TV
Published On

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) कायमच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. आजवर त्यांनी अनेक हिट चित्रपट केले आहेत. त्यांचे चित्रपट कायमच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. मात्र आता महेश भट्ट हे एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये महेश भट्टसोबत बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर देखील पाहायला मिळत आहे.

अनुपम खेर (Anupam kher) आणि महेश भट्ट यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये एका इव्हेंटमध्ये अनुपम खेर आणि महेश भट्ट एका स्टेजवर उभे असताना अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांना स्टेजवरुन खाली जायला सांगितले. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनुपम खेर यांच्या वागण्यामुळे नेटकरी त्यांना ट्रोल देखील करत आहेत. अनुपम खेर यांचा 'तुमको मेरी कसम'चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तुमको मेरी कसम' हा चित्रपट 21 मार्च 2025 ला रिलीज होणार आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटला अनुपम खेर सर्व स्टारकास्टसोबत स्टेजवर फोटोशूट करत होते. तेव्हा महेश भट्ट अनुपम खेर यांच्या खांद्यावर हात ठेवून फोटोशूट करत असताना अचानक अनुपम खेर महेश भट्ट यांना म्हणतात की, "आपको जाना चाहिए" हे ऐकताच महेश भट्ट स्टेजवरुन खाली उतरतात. अनुपम खेर महेश भट्ट यांचा हात पकडून त्यांना खाली उतरवतात. तेव्हा खाली आल्यावर सर्वजण "काय झालं" असे महेश भट्ट यांना विचारतात. तेव्हा ते बोलतात की, "मला जायला सांगितले."

महेश भट्ट आणि अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ पाहून एकीकडे नेटकरी अनुपम खेर यांना महेश भट्ट यांचा अपमान केल्यामुळे ट्रोल करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अनुपम खेर यांनी मैत्रीच्या नात्याने महेश भट्ट यांना स्टेजवरून उतरण्यास मदत केली यामध्ये कोणतेही दुसरे कारण किंवा अपमान नसल्याचे बोले जात आहे.

Anupam kher Insulted Mahesh Bhatt
Suraj Chavan : 'एका बुक्कीत टेंगूळ...' गुलीगत सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण, पाहा खास VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com