Chhaava Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava Box Office Collection : आया रे तुफान... 'छावा'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, लवकरच गाठणार १०० कोटींचा टप्पा

Chhaava Box Office Collection Day 2 : बॉक्स ऑफिसवर सध्या 'छावा'ची यशस्वी घौडदौड पाहायला मिळत आहे. लवकरच विकी कौशलचा 'छावा' चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करणार आहे.

Shreya Maskar

सध्या बॉक्स ऑफिसवर 'छावा' (Chhaava) चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. 'छावा' चित्रपटाने अवघ्या दोन दिवसात छप्परफाड कमाई केली आहे. 'छावा' चित्रपटात बॉलिवूडचा सुपरस्टार विकी कौशल ( Vicky Kaushal) आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल आणि महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना पाहायला मिळत आहेत.

'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2

'छावा' चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने रिलीजच्या दोन दिवसातच बंपर कमाई केली आहे. 'छावा' चित्रपटाने पहिल्या दिवशी 31 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी 36.50 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत दोन दिवसात चित्रपटाने तब्बल 67.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

विकी कौशलचा 'छावा' चित्रपट आता लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे. 'छावा' चित्रपटाने अवघ्या दोन दिवसात 50 कोटींहून अधिक कमाई केली आहे. लक्ष्मण उतेकर यांना 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'छावा' चित्रपटातून दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवली आहे. 'छावा' चित्रपट जवळपास तब्बल 130 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.

'छावा' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगमध्येच छप्परफाड कमाई केली होती. विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटाचे तगडे प्रमोशन केले होते. हा चित्रपट भविष्यात अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. 'छावा' चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. चित्रपट पाहण्यासाठी थिएटर बाहेर रांगाच रांगा पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : बायपासवर भीषण अपघात! ३ वाहनांची जोरदार धडक, ४ जणांचा होरपळून मृत्यू

१६ महिन्यांत ३६ जणांना मृत्युदंड, 'त्या' न्यायाधीशांची तडकाफडकी कौटुंबिक न्यायालयात बदली

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Tikhat Sev Recipe: दिवाळीला फराळ करताना घरी बनवा कुरकुरीत आणि झणझणीत तिखट शेव, वाचा रेसिपी

Drinks for Liver Health: यकृतावर घाणेरडी चरबी जमा झालीये? हे ६ ड्रिंक्स लिव्हर डिटॉक्स करण्यास ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT