Chhaava Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chhaava Box Office Collection : 'छावा'ची यशस्वी घौडदौड, सलग दुसऱ्या दिवशीही केली छप्परफाड कमाई; पाहा Day 2 चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

Chhaava Movie Box Office Collection Day 2 : पहिल्या दिवसाच्या तुलनेमध्ये छावाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. लवकरच हा सिनेमा १०० कोटींचा पल्ला गाठेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Yash Shirke

Chhaava Box Office Collection Day 2 : सध्या बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची मोठी चर्चा आहे. काल १४ फेब्रुवारी रोजी हा बहुप्रतिष्ठित चित्रपट प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित या चित्रपटाची सिनेरसिकांसह शिवप्रेमींना उत्सुकता होती. चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सलग दुसऱ्या दिवशीही छावाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली.

फिल्मीबिट डॉटकॉमने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटाने शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) ३१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. शनिवार म्हणजेच आज संध्याकाळपर्यंत चित्रपटाने ५० कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे. बॉक्स ऑफिसवर छावाची विजयी आणि विक्रमी घोडदौड सुरु आहे. रविवारपर्यंत हा सिनेमा १०० कोटींचा पल्ला गाठेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

सॅकनिल्कचा अहवालच्या अहवालानुसार, छावा चित्रपटाच्या संध्याकाळच्या शोमध्ये ५२.५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुपारी ही टक्केवारी ४७.०६ टक्के होती असे म्हटले जात आहे. एकंदर, पहिल्या दिवसाच्या तुलनेमध्ये दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत छावाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये ४०.५१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे म्हटले जात आहे.

बॉक्स ऑफिस कलेक्शनची आकडेवारी - छावा (दिवस दुसरा)

सकाळचे शो - ३२.९१ टक्के

दुपारचे शो - ४७.०६ टक्के

संध्याकाळचे शो - ५२.५७ टक्के

बॉक्स ऑफिस कलेक्शन -

दिवस पहिला (शुक्रवार) - ३१ कोटी रुपये

दिवस दुसरा (शनिवार) - २०.०२ कोटी रुपये (सायंकाळी ६.३० पर्यंत)

एकूण कलेक्शन - ५१.०२ कोटी रुपये

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनीत छावा चित्रपटाची चर्चा सुरु आहे. रसिकांसह समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर हा ऐतिहासिक चित्रपट आधारलेला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. लवकरच छावा १०० कोटी कलेक्शन करेल असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी असल्यास कोणती गंभीर लक्षणे दिसतात? जाणून घ्या

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; बड्या नेत्याची भाजपच्या दिशेनं वाटचाल, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT