Bharti singh: 'तो शो असाच आहे...'; भारती सिंगने घेतली समय रैनाची बाजू, केले पोटभर कौतुक

Bharti singh On Samay Raina: विनोदी अभिनेत्री भारती सिंगने वादग्रस्त स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाचे समर्थन केले आहे. तसेच तिने समयचे कौतुक देखील केले आहे.
Bharti singh On Samay Raina
Bharti singh On Samay RainaSaam Tv
Published On

Bharti Singh: स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या शोमध्ये रणवीर इलाहाबादियाने दिलेल्या विधानाने सुरू झालेले वादळ अजूनही शांत झालेले नाही. बियर बायसेप्स नावाचा पॉडकास्ट चालवणारा रणवीर यात अडकला पण त्याच वेळी शो चालवणाऱ्या समय रैनावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.

'इंडियाज गॉट लेटेंट' हा विनोदाच्या नावाखाली अशा अश्लील भाषेचा वापर करणारा पहिला शो नाही. वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर, कॉमेडियन भारती सिंगने यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. भारती सिंगने समय रैनाचे समर्थन केले आहे आणि म्हटले आहे की हा शो असाच आहे.

Bharti singh On Samay Raina
Vicky-Katrina: 'तिने मला समजून घेत...'; विकी कौशलने केले पत्नी कतरिना कैफचे कौतुक, व्हिडीओ व्हायरल

जर तुम्ही स्वतः तिथे गेलात तर...

भारती सिंगच्या आधी राखी सावंत, अली गोनी आणि मुनावर फारुकी यांनी समय रैनाला पाठिंबा दिला आहे. जेव्हा एका पापाराझीने भारती सिंगला समय रैनाच्या मुद्द्यावर मत व्यक्त करण्यास सांगितले तेव्हा कॉमेडी क्वीन म्हणाली, "तो शो असाच आहे, पण तुम्हाला शोमध्ये जाऊन शोमध्ये काय हवे आहे ते बोलण्याची गरज नाही. समय म्हणत नाही, तुम्ही असं बोला. समय खूप छान मुलगा आहे. तो जेन-झीचा आवडता आहे. जर तुम्ही स्वतः तिथे गेलात तर तुम्ही त्याचे चाहते व्हाल."

Bharti singh On Samay Raina
Salman Khan: सिकंदरनंतर सलमान खानचा 'हा' चित्रपट येणार भेटीला; ११ वर्षांनंतर करणार ब्लॉकबस्टरचा सिक्वल

'द कपिल शर्मा शो', 'खतरा खतरा खतरा' आणि 'लाफ्टर शेफ' यासारख्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेली भारती सिंग पुढे म्हणाली, "जर तुम्हाला त्याची भाषा आवडत नसेल, तर आपला वेळ घालवून तो शो पाहू नका." भारती सिंगने तिचा पती हर्ष लिंबाचिया आणि गायक टोनी कक्कर यांच्यासोबत समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये हजेरी लावली होती. याच शोमध्ये रणवीर इलाहाबादिया याने पालकांच्या लैंगिक संबंधांबद्दल केलेल्या विधानानंतर हा शो अधिक चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com