Chhaava SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava Box Office Collection : 'छावा'नं 'तानाजी'ला टाकलं मागे, १० दिवसांत ३०० कोटींचा टप्पा ओलांडला

Chhaava box office collection Day 10: विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने अवघ्या १० दिवसांत ३०० कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Shreya Maskar

'छावा' (Chhaava ) चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने काही दिवसातच आपले बजेट देखील वसूल केले आहे. छावा चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता विकी कौशल (vicky kaushal), महाराणी येसूबाईची भूमिकेत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना झळकला आहे.

'छावा'' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 10

  • 'छावा' पहिला दिवस 33.1 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 39.3 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 48.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 24 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 24.50 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 32 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 21.5 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 23 कोटी रुपये

  • नववा दिवस - 45 कोटी रुपये

  • दहावा दिवस - 40 कोटी रुपये

  • एकूण कलेक्शन - 326.75 कोटी रुपये

'छावा' चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. आता हा चित्रपट लवकरच 500 कोटींचा व्यवसाय करणार आहे. 'छावा'चे तगडे प्रमोशन करण्यात आले होते. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. 'छावा' चित्रपट तब्बल 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. 'छावा' चित्रपटातून दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवली आहे. छावा' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास 5 कोटी कमावले होते. विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने अजय देवगणच्या 'तानाजी' चित्रपटाला मागे टाकले आहे.

विकीच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' विकीच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटामुळे विकीच्या लोकप्रियतेत भर पडली आहे. 'छावा' चित्रपटातील विकीच्या अभिनयाचे चाहते दिवाने झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT