Chhaava : पहायला गेले छावा, पोलिसांनी केला गनिमी कावा; मकोकातील आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Chhaava Movie News : छावा सिनेमाची भुरळ फक्त सर्वसामान्यांनाच नाही तर गुन्हेगारांनाही पडलीय. मात्र मकोकातील आरोपींना छावा पाहायला जाणं महागात पडलंय. पोलिसांनी गनिमी कावा करुन पुण्यात मकोकातील आरोपींना जेरबंद केलंय. मात्र सिनेमागृहात कसा रंगला होता थरार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.
Chhaava Movie News
Chhaava Movie NewsSaam Tv
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपट गृहात गर्दी करत आहेत. मात्र पुण्यात सिनेमागृहातच पोलिसांनी गनिमी कावा करुन मकोकातील 2 आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. त्याचं झालं असं की, पुण्यातील हडपसर परिसरातील वैभव टॉकीजमध्ये धर्मेनसिंग भादा आणि बादशाहसिंग भोंड हे छावा पाहायला गेले आणि पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.. मात्र चित्रपटगृहात कसा रंगला अटकेचा थरार? पाहूयात.

चित्रपट गृहातच रंगला अटकेचा थरार

- धर्मेनसिंग भादा आणि बादशाहसिंग भोंड यांच्यावर मकोका, एनडीपीएसचे गुन्हे

- दोन्ही आरोपी वैभव टॉकीजमध्ये छावा पाहायला गेल्याची पोलिसांना टीप मिळाली

- पोलिसांनी प्लॅनिंग करुन सिनेमागृहात कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं

- अखेर पोलीसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Chhaava Movie News
Champions Trophy : ...आणि यांना चॅम्पियन बनायचंय! पहिल्यांदाच यजमानपद मिळालं अन् दुसऱ्या सामन्यात बाहेर पडले, पाकिस्तानची स्पर्धेतून एक्झिट

छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करत आणि छत्रपती संभाजी महाराजांनी थेट मुघलांना भिडून रयतेचं रक्षण केलं.. तसंच पोलिसांनीही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा गुन्हेगारांना सळो की पळो करुन सोडायला हवं.

Chhaava Movie News
Hardik Pandya : 7,00,00,000 रुपयांचे महागडे घड्याळ घालून मैदानात उतरला हार्दिक पंड्या, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com