Chanakya Marathi Movie Poster Instagram/ @nilesh.navalakha
मनोरंजन बातम्या

पाठीत खंजीर खुपसलेल्या नेत्याची 'चाणक्य' चर्चा; चित्रपटाचा पहिला पोस्टर बघून उत्सुकता वाढेल

चित्रपटाचे पोस्टर पाहताच चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाबद्दल राजकारणातूनही अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्याच्या राजकारणातच नाही तर देशाच्या राजकारणातही अभूतपुर्व बदल, नागरिकांनी कधीही न विचार केलेली युती आणि राजकारणातील उलथापालथ चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशी झाली. राज्याच्या राजकारणातील घडी अजून म्हणावी अशी बसलेली दिसत नाही. नुकत्याच काही वेबसीरिज आणि चित्रपटांच्या घोषणा दिग्दर्शक आणि निर्माते करताना दिसत आहेत. अशाच अभूतपुर्व घडलेल्या घटनेवर आधारित 'मी पुन्हा येईन' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. राजकारणाच्या आधारावर एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

राजकीय नाट्याचा थरार २०२३ या वर्षात 'चाणक्य' चित्रपट दाखवणार आहे. राज्यातील घडलेल्या घटनेवर हा चित्रपट मराठी व हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आले होते. प्रदर्शित झालेल्या पोस्टरवर प्रचंड मोठ्या जनसमुदायासमोर एक राजकीय नेता भाषण करताना दिसत आहे. त्याच्या पाठीत खुपसलेला खंजीर चित्रपटाच्या पोस्टरवर दिसत आहे. सध्याच्या राजकारणातील नाट्य या चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहताच चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाबद्दल राजकारणातूनही अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. (Maharashtra News)

निलेश नवलखा यांनी निर्मित केलेल्या अनेक चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. नवलाखा आर्ट्स मीडिया अँड एंटरटेनमेंटच्या माध्यमातून निलेश नवलखा यांनी शाळा, अनुमती, फॅंड्री आणि राक्षस चित्रपटाची निर्मिती केली आहे. निलेश नवलखा निर्मिती क्षेत्रासोबतच दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण करीत आहे. राजकारणामुळे उद्ध्वस्त झालेले कुटुंब, मुख्यमंत्री पदासाठी केलेले कारस्थान, राजकीय सुड हे सर्व 'चाणक्य' चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सामान्य माणसाच्या विचारांच्या पलिकडील विषय निर्माते- दिग्दर्शक निलेश नवलखा यांनी आपल्या पहिल्या चित्रपटात निवडला आहे. हा कल्पनेकडील उलथापालथींनी चित्रपटाच्या 'पॉलिटिकल थ्रिलर' विषयाची निवड केली आहे. चित्रपटामुळे काही वर्षातील घडलेले राजकीय नाट्य उलगडणार हे मात्र निश्चित. अद्याप चित्रपटातील सर्व पात्र गुलदस्त्यात असल्याने चित्रपटात कोण कलाकार असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे, सोबतच चित्रपट आगामी २०२३ वर्षात चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT