Kushal Badrike With Wife Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kushal Badrike: तुमच्यासोबत झालंय का कधी असं?, कुशल बद्रिकेची व्हॅलेंटाईन डे स्पेशल पोस्ट चर्चेत

Chala Hawa Yeu Dya Show: कुशल बद्रिकेने व्हॅलेंटाईन डेनिमित्त लाडकी बायको सुनयना बद्रिकेसाठी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. कुशल बद्रिकेने बायकोसोबतचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे.

Priya More

Kushal Badrike Valentine Day Special Post:

झी मराठीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’च्या (Chala Hawa Yeu Dya) माध्यमातून प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) सध्या चर्चेत आला आहे. आपल्या दमदार कॉमेडी आणि अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कुशलने व्हॅलेंटाईन डेनिमित्त (Valentine Day) बायकोसाठी खास पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. 'तुमच्या सोबत झालंय का कधी असं?', असं म्हणत कुशल बद्रिकेने त्याच्या चाहत्यांना प्रश्न विचारला आहे.

कुशल बद्रिकेने व्हॅलेंटाईन डेनिमित्त लाडकी बायको सुनयना बद्रिकेसाठी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. कुशल बद्रिकेने बायकोसोबतचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये कुशल हसताना दिसत आहे तर त्याची बायको त्याच्याकडे एकटक बघताना दिसत आहे.

हा फोटो शेअर करत कुशलने कॅप्शनमध्ये लिहिले की,'तुमच्यासोबत झालंय का कधी असं? की एखादं माणूस आपल्यासमोर येतं आणि जगात फक्त आपलंच घड्याळ स्लो मोशनमध्ये धावायला लागतं. न्यूटनने लावलेला गुरुत्वाकर्षणाचा शोध फाट्यावर मारून आपण तरंगूच लागतो एकदम. जत्रेतल्या चष्मेवाल्याकडचा 'गुलाबी गॉगल' चढवल्यासारखं फक्त आपलंच जग 'गुलाबी' होऊन जातं आणि 'जत्रेतला पाळणा' अजूनही स्लो मोशनमध्ये धावत आपल्या घड्याळात अडकून पडलेला असतो. बास बास तुमचा व्यवहारी जगाशी संबंध संपला. राजाहो तुम्ही प्रेमात आहात. आता स्लो मोशनमधलं 'जत्रेतलं घड्याळ' आणि तुमच्या 'मनगटावरचा पाळणा' नॉर्मलला आणायची चावी समोरच्या माणसाकडे आहे. देव तुमचं भलं करो:- सुकून.', असं म्हणत कुशल बद्रिके या पोस्टमध्ये चाहत्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देतो.

कुशल बद्रिकेच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. त्याच्या एका चाहतीने कमेंटमध्ये लिहिले की, 'किती सुंदर लिहितो रे दादा. फक्त वाचतच बसावं वाटतं. कधी लो फिल करते तेव्हा तुझी प्रोफाइल उघडून तुझे कॅप्शन वाचायला लागते.' दुसऱ्या चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, दादा आता कादंबरी लिहायला हरकत नाही' तर अनेकांनी 'सुंदर', 'मस्त', 'व्हॅलेटाईन डेच्या शुभेच्छा', अशा कमेंट्स केल्या आहेत.

कुशल बद्रिकेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, कुशल सध्या 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मागच्या महिन्यात त्याच्या 'स्ट्रगलर्स साला' या वेब सीरिजचा सातवा सीझन प्रदर्शित झाला. या वेबसीरिजमध्ये कुशल बद्रिकेसोबत संतोष जुवेकर,अभिजीत चव्हाण, विजू माने हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या या वेबसीरिजला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT