Shreya Bugde SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shreya Bugde : तुम्हाला हसवायला 'चला हवा येऊ द्या' पुन्हा येणार? कॉमेडी क्विन श्रेया बुगडेने दिली मोठी हिंट

Chala Hawa Yeu Dya Update : श्रेया बुगडेने 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोची मोठी हिंट दिली आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yevu Dya )या कॉमेडी शोनं आजवर अवघ्या जगाला हसवले आहे. या शोमधील पात्र प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करत आहेत. हा शो बंद झाल्यानंतर चाहते कार्यक्रम पुन्हा कधी सुरू होणार याची आतुरतेने वाट पाहत होते. यासंबंधित सोशल मिडियावर अनेक चर्चा देखील सुरू होत्या. मात्र आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 'चला हवा येऊ द्या' च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकतेच एका शोमध्ये 'चला हवा येऊ द्या' मधली कॉमेडीची क्विन श्रेया बुगडेने (Shreya Bugde) शोबाबत मोठी हिंट दिली आहे.

अलिकडेच अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिनेता गौरव मोरे हे श्रेयस तळपदे होस्ट करत असलेल्या 'चल भावा सिटीत' कार्यक्रमात आले होते. तेव्हा श्रेया बुगडेने 'चला हवा येऊ द्या' पुन्हा सुरू होत असल्याची हिंट प्रेक्षकांना दिली आहे. कार्यक्रमात श्रेयस श्रेया बुगडेला म्हणतो की, "महाराष्ट्रभर लोक तुझ्यावर प्रचंड प्रेम करतात...त्यांना तुला पुन्हा पुन्हा पाहावसं वाटतं...तर मग काहीतरी ठरव..."

श्रेयस तळपदेने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत श्रेया बुगडे म्हणाली, "मी देखील प्रेक्षकांना आणि मंचावर परफॉर्म करणं खूप मिस करते. आपल्याला माहित आहे, झी मराठी प्रेक्षकांना कधीच नाराज करत नाही... मी देखील काहीतरी कुजबूज ऐकली आहे...प्रेक्षकही उत्सुक खूप आहेत...लोकं ही विचारत आहेत...पण मला देखील नक्की काय ते माहित नाही..." यावर श्रेयस म्हणतो, "तू दिलेली ही हिंट आपल्या स्मार्ट प्रेक्षकांना समजली असेल..."

'चला हवा येऊ द्या' या शोनं १० वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्राला खळखळवून हसवले आहे. 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोची धुरा दिग्दर्शक-अभिनेता डॉ. निलेश साबळेने सांभाळली होती. अभिनेत्री श्रेया बुगडेने आजवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. ती आपल्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर चाहत्यांसोबत शेअर करते. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतो. तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी चाहते आतुर आहेत. तसेच 'चला हवा येऊ द्या' पाहण्यासाठी प्रेक्षक आता उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

Maharashtra Live News Update: परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT