Madness Machayenge Show Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shreya Bugade And Kushal Badrike News: श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिकेचं नशीब फळफळलं, ‘चला हवा येऊ द्या’नंतर ‘या’ हिंदी कॉमेडी शोमध्ये दिसणार

Madness Machayenge Show Promo: झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’तले सर्वच कलाकार मंडळी कायमच प्रेक्षकांना आपल्या खास मनोरंजन शैलीमुळे हसवत असतात. त्यांच्या कॉमेडी स्टाईलमुळे फार मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे.

Chetan Bodke

Madness Machayenge India Ko Hasayenge

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’तले सर्वच कलाकार मंडळी कायमच प्रेक्षकांना आपल्या खास मनोरंजन शैलीमुळे हसवत असतात. आपल्या खास हसवण्याच्या स्टाईलमुळे त्यांचा फार मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे. (Actor)

कुशल बद्रिके, भाऊ कदम, श्रेया बुगडे, प्रियदर्शन जाधव, स्नेहल शिदम, निलेश साबळे सह इत्यादी स्टारकास्टचा या कार्यक्रमामुळे फार मोठा चाहतावर्ग आहे. लवकरच यामधील दोन सेलिब्रिटी हिंदी टेलिव्हिजनसृष्टीतही प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करायला सज्ज झाले आहेत. ‘चला हवा येऊ द्या’तले दोन कलाकार मंडळी सोनी टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. (Actress)

नुकतंच सोनी टेलिव्हिजन वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजवर हा कार्यक्रमाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्या प्रोमोमध्ये मराठमोळा अभिनेता कुशल बद्रिके दिसत आहे. आता मराठीनंतर लवकरच हिंदीमध्येही कुशल प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी हा प्रोमो कुशल बद्रिकेसोबत अभिनेत्री श्रेया बुगडे हिलाही टॅग केला आहे. पण या प्रोमोमध्ये श्रेया बुगडे दिसत नाही. मराठी टेलिव्हिजनसृष्टीमध्ये प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केल्यानंतर कुशल आणि श्रेया आता लवकरच हिंदीमध्ये आपल्या निखळ मनोरंजनाने प्रेक्षकांना हसवायला सज्ज झाले. (Tv Serial)

प्रोमोमध्ये कुशल एका पोलिस हवलदाराच्या भूमिकेत दिसतोय. अभिनेत्री हुमा कुरेशी आणि प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन हर्ष गुजराल दोघेही या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करण्याची शक्यता आहे. पण हा कार्यक्रम नेमका कधी सुरु होणार, याची वेळ काय असणार याबद्दलची माहिती निर्मात्यांनी दिलेली नाही. या कार्यक्रमात कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, गौरव दुबे, केतन सिंग, अंकिता श्रीवास्तव, पारितोष त्रिपाठी, स्नेहिल मेहरा, इंदर सहानी हे विनोदवीर देखील झळकणार आहेत. या सेलिब्रिटी चेहऱ्यांना निर्मात्यांनी टॅग केलं आहे. सोनी टिव्हीवरील कोणता जुना शो बंद होणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. (Bollywood News)

सध्या कुशल आणि श्रेया हे दोघेही ‘चला हवा येऊ द्या’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अद्याप तरीही कुशल आणि श्रेयाने दोघांनीही ‘मॅडनेस मचायेंगे’ या कार्यक्रमाबद्दल कोणतेही भाष्य केले नाही. मुख्य बाब म्हणजे कुशल आणि श्रेया दोघेही ‘चला हवा येऊ द्या’ ला सोडचिठ्ठी देणार का ?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT