Rakhi Sawant And Rashmi Desai Instagram
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Mother Death: राखीच्या आईच्या निधनानंतर बॉलिवूड शोकाकूल; 'या' सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

अनेक सेलिब्रिटी राखी आणि तिच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाले आहेत.

Pooja Dange

Celebrity Show Their Condolences To Rakhi Sawant Mother Death: राखी सावंतची आई जया सावंत यांचे काल म्हणजे शनिवारी रात्री निधन झाले. ब्रेन ट्यूमर आणि कॅन्सरसारख्या आजारांनी त्या ग्रस्त होत्या. राखीने इन्स्टाग्रामवर तिच्या आईच्या निधनाविषयी सांगितले आहे. जया यांचा मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखीने हॉस्पिटलमधील तिच्या आईचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केला होता. तसेच राखी आईच्या तब्येतीबद्दल अपडेट्स शेअर करत होती. तसेच राखीने पापाराझी व्हिडिओंच्या माध्यमातून तिची आई लवकर वारी व्हावी यासाठी चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते.

रविवारी म्हणजे आज राखीच्या आईवर अंत्यसंस्कार होतील, असे राखीने सांगितले आहे. जॅकी श्रॉफ, मान्यता दत्त, अली गोनी आणि रश्मी देसाई यांसारख्या अनेक सेलिब्रिटी राखी आणि तिच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाले आहेत.

अभिनेता जॅकी श्रॉफने राखीच्या इन्स्टाग्राम रीलवर कमेंट केली, "मी तुझे दुःख समजू शकतो, मी माझे आई, बाबा, भाऊ गमावले आहेत; त्यांचा आत्मा नेहमीच आपल्यासोबत असेल." राखीच्या व्हिडिओवर अभिनेत्री रिद्धिमा पंडितने लिहिले, "राखी स्ट्रॉंग राहा, प्रार्थना आणि प्रेम पाठवत आहे... त्यांच्या आत्म्याला शांती मिळो."

अभिनेत्री निशा रावलने कमेंट केली आहे, "माझ्या प्रिय राखी, मी काकूंना नेहमी हसतमुख सुंदर कपडे घातलेले पाहिले आहे, तिला असे पाहून माझे हृदय तुटले आहे! त्यांच्या शांततामय प्रवासासाठी प्रार्थना करत आहे! देव तुला शक्ती देवो." अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने देखील रेखाच्या दुःखात सहभागी झाली आहे, "देव तुमच्या कुटुंबाला हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती आणि धैर्य देवो. ओम शांती! त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."

इन्स्टाग्रामवरील पापाराझी पेजवर शेअर केलेल्या राखीच्या व्हिडिओवर कमेंट करता अभिनेत्री अनिता हसनंदानी यांनी लिहिले, "RIP". याच पोस्टवर अभिनेत्री रश्मी देसाईने कमेंट केली, "RIP, om shanti." अभिनेत्री रोशनी वालियाने लिहिले आहे, "अत्यंत वेदनादायक, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो." अभिनेत्री सोनल चौहान, प्रिन्स नरुला आणि अली गोनी यांनी कमेंट करता तुटलेले हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहे.

इस्टाग्राम स्टोरीजवर, राखीने तिच्या दिवंगत आईसोबतचा तिचा फोटो आणि एक व्हॉट्सअॅप मेसेज देखील शेअर केला आहे, ज्यात लिहिले आहे, "खूप दु:खासह, मी राखी सावंत तुम्हाला माझ्या प्रिय आईच्या आकस्मिक निधनाची माहिती देत ​​आहे. तुमच्यापैकी बरेच जणांना माहित आहे की तिला काही वैद्यकीय समस्या होत्या, ती गेली हे सांगताना मला दुःख होत आहे. उद्या दुपारी 12 वाजता माझ्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी सामील व्हा. पत्ता: म्युनिसिपल ख्रिश्चन सेमेटरी, ओशिवरा, अंधेरी, पश्चिम."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

Reviver Upay: रविवारी हे उपाय बदलतील तुमचं आयुष्य; सर्व समस्यांपासून मिळेल मुक्तता

Tithal Beach : पावसाळ्यात 'तिथल' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ठाण्यावरून थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, तयार होतोय नवा भुयारी मेट्रो मार्ग; सर्वाधिक फायदा कुणाला?

SCROLL FOR NEXT