Anushka Sharma Virat Kohli wedding anniversary Saam TV
मनोरंजन बातम्या

Virat-Anushka: पाच वर्षांपूर्वी विराट-अनुष्काच्या लग्नात झाली होती कोट्यवधींची उधळण; आजही आहे श्रीमंतांच्या यादीत समावेश

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी इटलीमध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले होते.

Pooja Dange

Virat-Anushka Wedding Anniversary: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघेही आपापल्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघेही लग्नबंधनात अडकले. लग्नाआधीही अनुष्का विराटला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये जायची. त्यामुळेच दोघांच्या नात्याविषयी चर्चा होऊ लागली. नंतर दोघांनीही त्यांचे नाते सर्वांसमोर मान्य केले.

11 डिसेंबरला विराट आणि अनुष्काच्या लग्नाला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी इटलीमध्ये (टस्कनी येथील बोर्गो फिनोचिएटो) मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले होते. त्यांच्या लग्नाचा एकूण खर्च 50 कोटींहून अधिक झाला होता. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाला फक्त जवळच्या लोकांनीच हजेरी लावली होती. (Celebrity)

भारतीय खेळाडू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे 11 डिसेंबर 2017 रोजी लग्न झाले होते. त्यावेळी विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार होता आणि त्याचे नाव जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होते.अनुष्का शर्माबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपटही दिले होते. भारतात परतल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी दोन रिसेप्शन पार्टी दिल्या, ज्यात त्यांनी बॉलिवूड, क्रिकेट आणि राजकारणातील अनेक दिग्गजांना आमंत्रित केले होते. एक पार्टी मुंबईत तर दुसरी पार्टी दिल्लीत मोठ्या थाटात पार पडली. (Virat Kohli)

विराट कोहलीची संपत्ती आणि अनुष्का शर्माची कमाईही करोडोंमध्ये आहे. विराट आणि अनुष्का फक्त इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून करोडो रुपये कमावतात. क्रिकेटशिवाय विराट आणि अनुष्का एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही भरपूर कमाई करतात. जगातील प्रसिद्ध खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे. उत्पन्नच्या बाबतीत विराटची गणना जगातील 100 खेळाडूंमध्ये होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची महाष्ट्राच्या राजकारणात होणार एन्ट्री? कोण काय म्हणालं? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime: नाशिक जिल्हा....; पुस्तकांऐवजी बॅगेत कोयता अन् चॉपर, महाविद्यालीन विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीचे फॅड

Hindu Festivals: रक्षाबंधन आणि भाऊबीजमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT