Celebrity Couple Divorce Saam Tv
मनोरंजन बातम्या

Celebrity Couple Divorce : हार्दिक- नताशा ते मलायका- अर्जुन २०२४ मध्ये अनेक सेलिब्रिटी कपलचे संसार मोडले, पाहा यादी...

Celebrity Couple Divorce : २०२४ हे वर्ष बऱ्याच सेलिब्रिटिजमध्ये दुरावा करुन गेलं आहे. याचं कारण म्हणजे, यावर्षी रुपेरी पडद्यावरील बऱ्याच जोड्या दूर झाल्यात.

Mohini Sonar

२०२४ हे वर्ष बऱ्याच सेलिब्रिटिजमध्ये दुरावा करुन गेलं आहे. याचं कारण म्हणजे, यावर्षी रुपेरी पडद्यावरील बऱ्याच जोड्या दूर झाल्यात. सध्या तरी हार्दिक पांड्या आणि नताशा वेगळे झाल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

४ वर्षांच्या संसारानंतर नताशा आणि हार्दिकनं सोशल मीडियावर पोस्ट करत आपण वेगळे होण्याची माहिती दिली. दरम्यान त्यामुळे त्यांच्या खूप लवकर संपलेल्या या नात्यावर नेटकरी चांगल्याच कमेंट्स करत आहे. मात्र या लिस्टमध्ये आणखीही काही नावं या वर्षी सामिल झाली आहेत. ज्यांचे संसार तुटले आहेत.

Malaika Arora and Arjun Kapoor's Breakup

मलायका अरोरा-अर्जून कपूर

गेल्या बऱ्याच दिवसांपासून मलायका अरोरा आणि अर्जून कपूर एकमेकांमना डेट करत होते. त्यांच्या नात्याविषयी अनेकांना माहितीही होती. कारण, बऱ्याच वेळा हे दोघं सोबत स्पॉट झाले आहेत. शिवाय एकमेकांबद्दल ते सोशल मीडियावर प्रेमही व्यक्त करत होते.

पण आता या दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्यामुळे त्या दोघांचं ब्रेक अप झाल्याचीही माहिती आहे. मलायका अरोराने काही वर्षांपुर्वी अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला होता.

Esha Deol And Bharat Takhtani Divorce

ईशा देओल-भरत तख्तानी

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलनं 2012 मध्ये भरत तख्तानी या बिझनेसमॅनशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 12 वर्षांनंतर त्यांनी आता घटस्फोट घेतला आहे. भरत तख्तानी याचं दुसऱ्या कुणाशी अफेअर असल्यानं तो ईशाची फसवणूक करत होता, अशी माहिती आहे. दरम्यान, यावरुन त्यांच्य़ात भांडणं झाली, मतभेद झाले. त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेतलाय.

Isha Koppikar And Timmy Narang Photos

ईशा कोप्पीकर-टीम्मी नारंग

क्रिष्णा कॉटेज फेम ईशा कोप्पीकर आणि बिझनेसमन असलेला तिचा नवार टीम्मी नारंगनं 2024च्या सुरुवातीलाच विभक्त होणार असल्याची घोषणा केली होती. 2009 मध्ये इशा आणि टिम्मीनं लगीनगाठ बांधली होती.

मात्र जवळपास 15 वर्षांनी दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. इतक्या वर्षांच्या सुखी संसारानंतर आता आमच्यात मदतभेद झाल्याची कबुली दोघांनीही दिली होती...

Dalljiet Kaur And Nikhil Patel Divorce

दलजीत कौर-निखिल पटेल

टीव्ही क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या अभिनेत्री दलजीत कौरनं लग्नाच्या अवघ्या वर्षभरात घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीच दलजीत कौरनं परदेशी बिझनेसमन निखिल पटेलसोबत लग्न केलं होतं..

लग्नानंतर ती निखिलसोबत परदेशातच होती. मात्र काही महिन्यातच ती मायदेशी परतली. निखिल एका व्यक्तीला डेट करत असल्याची माहिती दलजीतनं दिली होती. तसंच आपण वेगळं होणार असल्याची घोषणाही तिनं सोशल मीडियावर केली आणि अखेर दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला.

Hardik-Natasha Divorce

हार्दिक पांड्या-नताशा स्टॅनकोव्हिच

क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि मॉडेल तसंच डान्सर असलेल्या नताशानं घटस्फोट घेतला आहे,... 4 वर्षांच्या संसारानंतर हार्दिक आणि नताशानं विभक्त होण्याचा निर्णय घेतला. गेल्या कित्येक दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाची चर्चा होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. वेगळे झाल्यानंतर मिळून मुलांचा सांभाळ करणार असल्याचं हार्दिक आणि नताशानं सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT