Rocky Aur Rani Ki Prem Kahani Film Producer CBFC Gives Major Changes Instagram
मनोरंजन बातम्या

Rocky Aur Raani Ki Prem मधील ‘या’ सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने लावली कात्री, सांगितले महत्वाचे बदल

RARKPK Film News: सेंट्रल बोर्डाने‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’मध्ये काही कट सुचवल्यानंतर या चित्रपटाला प्रमाणित केल्याचे समोर आले.

Chetan Bodke

RARKPK Film Producer CBFC Gives Major Changes: करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. टिझर, ट्रेलर आणि गाण्यांनी चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता वाढवली आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्टची जोडी प्रेक्षकांना फारच भावली असून चाहत्यांमध्ये चित्रपटाची बरीच चर्चा आहे. यापूर्वी आलिया आणि रणवीर एकत्रित ‘गली बॉय’ चित्रपटात एकत्र दिसले होते.

सध्या ही टीम प्रमोशनमध्ये व्यग्र असून चित्रपटाच्या ट्रेलर मधील काही दृष्यांवरून बराच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे तो वाद कोर्टात गेला होता. पण आता मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण त्या करीता निर्मात्यांना चित्रपटात मोठ्या बदलांना सामोरं जावं लागणार आहे.

चित्रपटातील गाण्यांची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु असून प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत. चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत असताना, सेंट्रल बोर्डाने ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’मध्ये काही कट सुचवल्यानंतर या चित्रपटाला प्रमाणित केल्याचे समोर आले. चित्रपटातील काही दृश्यांमध्ये अर्वाच्च भाषा वापरण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाने सांगितल्या प्रमाणे, चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्य देखील आहेत. हे पाहून बोर्डाने चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले आहे. यावेळी सेंट्रल बोर्डाने संवादांमध्ये अनेक बदलही सुचवले आहेत.

सेंट्रल बोर्डाने चित्रपटात सांगितलेल्या काही बदलांमध्ये आधी अर्वाच्च भाषेचा वापर करण्यात आला होता, अखेर तो बदल करण्यात आला आहे. सोबतच लोकप्रिय रम ब्रँड ओल्ड मॉंकचे नाव बदलून 'बोल्ड मॉंक' करण्यात आले. सोबतच, सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना लोकसभेचा वापर देखील वगळण्यास सांगितला. ट्रेलरमधील एका दृश्यात राणीच्या घरी नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांचा एक फोटो लावण्यात आला आहे. त्या दृश्यात एका विशिष्ट शब्दाची जागा फिल्टरने घेतली आहे.

चित्रपट प्रदर्शनाच्या काही दिवस आधीच सेंट्रल बोर्डाने चित्रपट व्यवस्थित पाहिला आहे. त्याचे सखोल परिक्षण करूनच निर्मात्यांना बदल सुचवला आहे. सोबत सेंट्रल बोर्डाने निर्मात्यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव असणारे संवाद काढून टाकण्यासाठी देखील सांगितले आहे. सेंट्रल बोर्डाने चित्रपटाला बुधवारी सेन्सॉर सर्टिफिकेट दिले असून हा चित्रपट २ तास ४८ मिनिट इतका कालावधी असणारा हा चित्रपट आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ चित्रपट येत्या २८ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर, चित्रपट येत्या २८ जुलै २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मुख्य भूमिकेत रणवीर सिंग, आलिया भट्ट सोबत शबाना आझमी, धर्मेंद्र,जया बच्चन आणि मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग देखील या चित्रपटात दिसणार आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून करण जोहर तब्बल सात वर्षांनी दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ए दिल है मुश्कील’ हा चित्रपट करणचा अखेरचा दिग्दर्शित केलेला चित्रपट ठरला. इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रेल्वेच्या धडकेने दोघांचा मृत्यू,पंढरपूरमधील घटना

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

SCROLL FOR NEXT