RCB VS PBKS: IPL 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यातील लढत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, कॅनेडियन रॅपर ड्रेकने RCB च्या विजयावर तब्बल 750,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 6.41 कोटींचा सट्टा लावून सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर हा सट्ट्याचा स्क्रीनशॉट शेअर करत "Ee Sala Cup Namde" हा लोकप्रिय घोषवाक्य वापरले आहे.
RCB आणि PBKS या दोन्ही संघांनी आजवर IPL चे विजेतेपद मिळवलेले नाही. RCB ने क्वालिफायर 1 मध्ये PBKS ला 8 विकेट्सने पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या विजयामुळे RCB च्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. अंदाजानुसार, RCB च्या मजबूत गोलंदाजी आघाडीमुळे त्यांना थोडा फायदा आहे, परंतु PBKS च्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.
ड्रेकने यापूर्वीही क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावला आहे. IPL 2024 च्या अंतिम सामन्यात त्याने कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयावर 250,000 डॉलर्सचा सट्टा लावला होता. तसेच, 2024 च्या T20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यात त्याने भारताच्या विजयावर 5 कोटींचा सट्टा लावला होता. या सट्ट्यांमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण झाली होती. दरम्यान, जर आज विराट कोहलीचा संघ या सामन्यात जिंकला तर ड्रेकला १.३१२ मिलियन डॉलर्स म्हणजेच ११,२१,५७,६९७ रुपये मिळतील.
ड्रेकच्या या सट्ट्यामुळे RCB च्या चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. "Ee Sala Cup Namde" हे घोषवाक्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आजच्या सामन्यात कोणता संघ IPL चे पहिले विजेतेपद मिळवेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.