BTS Star Jungkook Saam Tv
मनोरंजन बातम्या

BTS Star Jungkook: 'मी निष्काळजीपणे वागलो...; BTS स्टार जंगकूकने का मागितली चाहत्यांची माफी? नेमकं काय घडलं

BTS Star Jungkook: दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध K-pop बँड BTS जगभर प्रसिद्ध आहे आणि त्यातील प्रत्येक सदस्याचे चाहते कोट्यवधींच्या संख्येने आहेत. अलीकडेच BTS च्या जंगकूकवर त्याचे चाहाते नाराज झाले आहेत.

Shruti Vilas Kadam

BTS Star Jungkook : दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध K-pop बँड BTS जगभर प्रसिद्ध आहे आणि त्यातील प्रत्येक सदस्याचे चाहते कोट्यवधींच्या संख्येने आहेत. अलीकडेच BTS च्या जंगकूकने एका कार्यक्रमात घातलेल्या कॅपमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कॅपवर “Make Tokyo Great Again” असा मजकूर लिहिला होता. या वाक्यामुळे काही जपानी चाहते नाराज झाले आणि त्यावर टीकाही झाली. त्यानंतर जंगकूकने माफी मागितली आहे.

ही घटना BTS च्या अलीकडील FESTA 2025 कार्यक्रमादरम्यान घडली. जंगकूक या कार्यक्रमात सहभागी झाला होता आणि त्याने जी कॅप घातली होती, तिच्यावर एक वाक्य छापलेले होते. हे वाक्य अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या “Make America Great Again” या प्रकारचे आहे. यामुळे काही जपानी चाहत्यांनी हे एक राजकीय विधान आहे असे समजून नाराजी व्यक्त केली.

प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन जंगकूकने वेळीच यावर स्पष्टीकरण देत माफी मागितली. सोशल मीडियावर पोस्ट करत तो म्हणाला, “मी ज्या कॅपची निवड केली, ती केवळ स्टाईल म्हणून केली होती. त्या वाक्यामागील राजकीय किंवा सामाजिक अर्थाचा मी विचार केला नव्हता. माझा हेतू कुणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. मी निष्काळजीपणे वागलो, याची मला जाणीव आहे आणि मी त्याबद्दल माफी मागतो.”

BTS फॅन्स मात्र या माफीनंतर जंगकूकच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्यांनी सांगितले की जंगकूकचा हेतू कुठल्याही वादाला खतपाणी घालण्याचा नव्हता. मात्र, जपानी सोशल मीडियावर या घटनेवरून काही प्रमाणात नाराजीचे सूर अजूनही ऐकायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fatty Liver In Women's: फॅटी लिव्हर असल्यास महिलांमध्ये दिसतात 'अशी' लक्षणे

मुळशीत घरात शिरला भला मोठा साप, आजीनं दाखवला धमाका

Joe Root : सचिन तेंडुलकरचा महाविक्रम धोक्यात, 'मास्टर ब्लास्टर'चा रेकॉर्ड इंग्लंडचा जो रूट मोडणार?

India-UK Trade Deal: भारत-ब्रिटन मुक्त व्यापाराचा फायदा नेमका कुणाला?; काय स्वस्त- काय महाग होणार?

Maharashtra Politics: राज्यात 100 कोटींचा घोटाळा? हेल्थ एटीएमची विनाटेंडर खरेदी?

SCROLL FOR NEXT