Pankaj Udhas Passed Away Saamtv
मनोरंजन बातम्या

Pankaj Udhas Death: जादुई आवाज हरपला! ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा

Pankaj Udhas Life Journey: ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी पंकज उधास यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ७२ व्या वर्षी पंकज उधास यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज उधास यांच्या निधनाने संगीत जगतावर शोककळा पसरली आहे.

Gangappa Pujari

Pankaj Udhas Passed Away:

संगीत विश्वातून एक दुखःद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकज उधास हे आजारी होते. आज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७२ व्या वर्षी पंकज उधास यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज उधास यांच्या निधनाने संगीत जगतावर शोककळा पसरली आहे. (Pankaj Udhas Died)

आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास (Pankaj Udhas Passed Away) यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले आहे. वयाच्या 72 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. त्यांच्या या निधनावर चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पंकज उधास यांचा 26 फेब्रुवारी रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी 11 वाजता मृत्यू झाला गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्या बाबतची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या मुलीने ही माहिती दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमध्ये झाला होता. 1980 ते 1990 च्या दशका ते भारतातील सर्वात लोकप्रिय गझल गायक बनले. त्यांनी त्यांच्या मधुर आवाजाने भारतीयांचे मन जिंकले होते. भारतातच नाही तर परदेशात देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.1980 मध्ये आहत नावाच्या अल्बमच्या मार्फत आपल्या यशस्वी कारकिर्दीला सुरुवात केली.

महेश भट्ट यांच्या नाम या चित्रपटातील चिठ्ठी आयी है या गाण्यातून पंकज उधास घराघरात पोहचले. त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. 2006 मध्ये संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पंकज उधास यांना पद्मश्री या भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले.(Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT