ब्राझीलमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ब्राझीलमधील गॉस्पल सिंगर पेड्रो हेनरिक याचा स्टेजवर परफॉर्मन्स करताना अचानक खाली कोसळला. 30 वर्षीय पेड्रो बुधवारी (१३ डिसेंबर २०२३) एका कार्यक्रमामध्ये परफॉर्म करत होता.
गाणं गायल्यानंतर आणि प्रेक्षकांसोबत संवाद साधल्यानंतर अचानक तो जमिनीवर पडला आणि बेशुद्ध झाला. ही सर्व घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
व्हिडीओमध्ये पेड्रो हेनरिक व्हिडीओमध्ये, Vai Ser Tão Lindo नावाचे गाणे गात असताना दिसतो. व्हाईट शर्ट आणि पँट आणि टीशर्ट असा त्याने लूक केला होता. प्रेक्षकही त्याच्यासोबत गाणे गाताना दिसत आहे. काही वेळानंतर तो थांबला, अचानक तो स्टेजवर कोसळला आणि बेशुद्ध झाला. पॅड्रीसोबत स्टेजवर उभा असलेला गिटारिस्ट सुद्धा बघतच राहिला. पॅड्रीला लगेचच जवळच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आले. पण तिथे त्याला निधन झाल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टेज परफॉर्म करण्यापूर्वी पेड्रोने त्याच्या मित्राला थकल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले होते. गायकाला हार्ट अटॅक आल्यामुळे त्याचा जीव गेल्याची माहिती हेनरिकच्या रेकॉर्ड लेबल टोडाह म्युझिकने रेडिओ 93 ला सांगितलं. पेड्रोच्या परिवारबद्दल सांगायचे तर, ३० वर्षीय पेड्रोने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गाणं गायला सुरुवात केली आहे. २०१५ मध्ये, युट्यूबवर अनेक व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. यानंतर पेड्रोने स्थानिक बँडमध्ये सहभाग घेतला होता. २०१९ पासून हेनरिकने आपल्या सोलो करियरला सुरुवात केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.