‘बॅाईज’ च्या ट्रायोलॉजीची खासियत म्हणजे त्यातले वेगवेगळ्या धाटणीतले गाणे. बॉईजच्या प्रत्येक भागातल्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बहुप्रतिक्षित ‘बॉईज ४’चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर चित्रपटातलं 'गाव सुटना' हे अस्सल गावरान गाणं प्रदर्शित झालं होतं. आता त्यानंतर नुकतंच सोशल मीडियावर प्रत्येकाला थिरकायला लावणारे ‘ये ना राणी’ हे पार्टी साँग प्रदर्शित झालंय.
चित्रपटातले गाणे आणि त्याच्या हूक स्टेप्सने चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतलाय. पार्टी साँग्स आणि लव्ह साँग्सने चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणून धरली आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणारे ‘ये ना राणी’ हे पार्टी साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. (Marathi Film)
सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे आणि जुई बेंडखळे यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या हॅपनिंग साँगला अवधूत गुप्ते यांचे जबरदस्त संगीत आणि बोल लाभले आहे. तर अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या आवाजाने गाणे अधिकच जल्लोषमय झालेय.
राहुल ठोंबरे यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. हे एनर्जेटिक गाणे तरूणाईला आवडेल, असे आहे. या गाण्याचे बोल, संगीत खूपच स्फूर्तीदायी आहे. त्यामुळे नवीन वर्षात प्रत्येक पार्टीत हे गाणे नक्कीच वाजणार. (Song)
गाण्याबद्दल संगीतकार अवधूत गुप्तेने सांगितले की, “ 'बॉईज ४' मधील दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आता तसाच प्रतिसाद प्रेक्षकांकडून 'ये ना राणी तू ये ना' या गाण्यालाही मिळेल. हे गाणं ऐकल्यावर नक्कीच तुमचा मूड फ्रेश होईल. तरूणाईला हे गाणे विशेष आवडणारे आहे. गाणे जरी भन्नाट असले तरी याचे नृत्यदिग्दर्शनही तितकेच भारी आहे. मुळात हे गाणे करताना आम्हीही खूप धमाल केली आहे. सर्वांनीच हे गाणे खूप एन्जॅाय केले आहे. मला खात्री आहे, संगीतप्रेमींना हे गाणे तितकेच आवडेल.”
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत तर विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे. या चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २० ऑक्टोबरपासून ‘बॅाईज ४’ आपल्या जवळच्या थिएटरमध्ये पाहायला मिळेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.