Shah Rukh Khan Jawan Movie Instagram @redchilliesent
मनोरंजन बातम्या

Boycott Jawan Movie: रिलीजच्या एक दिवसआधीच 'किंग खान'ला मोठा झटका, ट्रेंड होतोय बॉयकॉट जवान; नेमकं कारण काय?

Shah Rukh Khan Jawan Movie: सध्या ट्विटरवर बॉयकॉट जवानचा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. जवान चित्रपटाला बायकॉट करण्यात यावा अशी नेटिझन्सनी मागणी केली आहे.

Priya More

Jawan Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या (Actor Shah Rukh Khan) आगामी 'जवान' चित्रपटाची (Jawan Movie) सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या चित्रपटाबाबत सर्वजण खूपच उत्सुक असतानाच शाहरुख खानला मोठा धक्का बसला आहे. सध्या ट्विटरवर बॉयकॉट जवानचा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. जवान चित्रपटाला बॉयकॉट करण्यात यावा अशी नेटिझन्सनी मागणी केली आहे.

शाहरुख खानचा पठाण चित्रपट रिलीज होण्यापूर्वी देखील बॉयकॉटचा (#BoycottJawanMovie) ट्रेंज सुरु होता. पण असे असताना देखील पठाणने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. आता जवान बॉक्स ऑफिसवर काय जादू करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'जवान' चित्रपट उद्या म्हणजेच गुरुवारी जन्माष्टमीला प्रदर्शित होणार आहे. पण चित्रपट रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाचा बॉयकॉट हा हॅशटॅग बुधवारी सकाळपासूनच ट्रेंड करत आहे. यावर्षी प्रदर्शित होणारा हा पहिला चित्रपट आहे ज्याच्या बहिष्काराचा ट्रेंड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच ट्वीटरवर ट्रेड करत आहे. बॉयकॉट जवान या हॅशटॅगला सामोरे जाण्यासाठी 'जवान' चित्रपटाची मार्केटिंग टीम आज सकाळपासून सक्रिय झाली आहे.

एकीकडे, शाहरुखचे चाहते जवानसाठी खूपच उत्सुक आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर #BoycottJawanMovie ट्रेंड होऊ लागला आहे. यामागे अनेक कारणं आहेत. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, 'मंदिर कोणता स्टुडिओ नाही. ज्याठिकाणी चित्रपटांचे प्रमोशन करतात.' तर काही लोकं इतर कारणांमुळे जवानला विरोध करत आहे. 'चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच हिंदू मंदिरांची तुम्हाला आठवण येते का?', असा सवाल काहींनी केला आहे.

'बॉयकॉट जवान चित्रपट'चा बॉक्स ऑफिसवर परिणाम होईल की नाही हे येणाराच काळ ठरवेल. पण या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधूनच २६.४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'जवान' पहिल्याच दिवशी ७० कोटींहून अधिक कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. पहिल्या दिवशी आतापर्यंत देशात १० लाख तिकिटांची विक्री झाली असल्याचे सांगितले जात आहे. तसंच आज . आज अॅडव्हान्स बुकिंगचा शेवटचा दिवस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT