Boys 4 Announcement: ‘आपण येणार तर धमाका होणार...’ ढुंग्या, धैऱ्या अन् कबीर या त्रिकुटाचा ‘बॉईज ४’ लवकरच

Boys 4 Announcement: ‘बॉईज ३’ च्या भरघोस यशानंतर आता ‘बॉईज ४’ बॉक्स ऑफिसवर धमाका करायला येत आहेत.
Boys 4 Announcement
Boys 4 AnnouncementInstagram

Boys 4 Announcement

ढुंग्या, धैऱ्या आणि कबीर या त्रिकुटाची पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर तुफान चर्चा होणार आहे. आतापर्यंत ‘बॉईज’, ‘बॉईज २’ आणि ‘बॉईज ३’नंतर लवकरच ‘बॉईज ४’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सुपरहिट ब्लॉकबस्टर ‘बॉईज’च्या सिरीजने सर्वांचे भरभरून मनोरंजन केले आहे. ‘बॉईज ३’ च्या भरघोस यशानंतर आता ‘बॉईज ४’ बॉक्स ऑफिसवर धमाका करायला येत आहेत.

Boys 4 Announcement
Kaun Banega Crorepati 15: ‘या’ प्रश्नाचं उत्तर आलं असतं तर ७ कोटी जिंकून बदललं असतं जसप्रीतचं आयुष्य, पण...

नुकतेच ‘बॉईज ४’चे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून ‘आपण येणार तर धमाका होणार’ असं म्हणत ‘बॉईज ४’ येत्या २० ऑक्टोबर सर्वांच्या भेटीला येत आहेत. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ४’ चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया हे निर्माते आहेत तर ऋषिकेश कोळी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. वैशिष्टय म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील हा एकमेव चित्रपट आहे, ज्याचे चार भाग आले आहेत. (Marathi Film)

Boys 4 Announcement
Bollywood Celebrity On India: इंडियाच्या वादात बॉलिवूड सेलिब्रिटींची उडी, बिग बींनंतर कंगना आणि जॅकी श्रॉफ स्पष्टच बोलले...

यापूर्वी ‘बॉईज’च्या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालता होता. आता यंदाच्या वर्षी धैर्या, ढुंग्या आणि कबीर काय धमाका करणार आहेत, हे पाहाण्याची सर्वांनाच आता उत्सुकता लागली आहे. (Actors)

‘बॉईज ४’ बद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणाले, “आतापर्यंत ‘बॉईज’च्या तिन्ही भागांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. या तिन्ही भागांमध्ये काहीतरी सरप्राईस होते. ‘बॉईज ४’ मध्येही असेच सरप्राईस आहे. प्रेक्षकांचे मिळणारे प्रेम पाहूनच आम्हाला ‘बॉईज ४’ करण्याची प्रेरणा मिळाली. मला खात्री आहे, हा चित्रपटही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करेल.” (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com