Kaun Banega Crorepati 15: ‘या’ प्रश्नाचं उत्तर आलं असतं तर ७ कोटी जिंकून बदललं असतं जसप्रीतचं आयुष्य, पण...

KBC15 7 Crore Question: पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातून आलेला स्पर्धक जसकरण १ कोटी रुपये जिंकला आहे.
KBC15 7 Crore Question
KBC15 7 Crore QuestionInstagram
Published On

KBC15 7 Crore Question

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉट सीटवर येणाऱ्या स्पर्धकांची कहाणी कायमच जनसामान्यांसाठी प्रेरणादायक ठरते. शोमध्ये दाखवण्यात येणाऱ्या संघर्षाची, आकांक्षांची आणि स्वप्नपूर्तीसाठी केलेल्या परिश्रमाची कहाणी अनेकांनी जगण्याची नवी उमेद देते. नुकताच या शोला पहिलाच एक कोटीच्या प्रश्नाचे उत्तर बरोबर देणारा स्पर्धक मिळाला आहे. पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातून आलेला स्पर्धक जसकरण १ कोटी रुपये जिंकला आहे.

KBC15 7 Crore Question
Bollywood Celebrity On India: इंडियाच्या वादात बॉलिवूड सेलिब्रिटींची उडी, बिग बींनंतर कंगना आणि जॅकी श्रॉफ स्पष्टच बोलले...

पंजाबचा जसकरण हा १५ व्या सीझनचा पहिला करोडपती स्पर्धक ठरला आहे. मात्र, सात कोटींसाठी त्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देता नं आल्याने त्याला १ कोटी रुपये इतकेच पैसे जिंकता आलेय. अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या ७ कोटींसाठी “पद्मपुराणानुसार कोणत्या राजाला हरणाच्या शापामुळे शंभर वर्षे वाघाच्या रूपात राहावे लागले?” असा प्रश्न होता. या प्रश्नावर बिग बींनी क्षेमधुरि, धर्मदत्त, मिताध्वजा आणि प्रभंजना असे चार पर्याय दिले होते.

सात कोटींच्या या प्रश्नाचं उत्तर देताना, जसकरण बराच गोंधळलेला दिसत होता. तो काही वेळ विचार करत राहिला पण त्याला उत्तर देता आलं नाही. शेवटी १ कोटी रुपये जिंकत त्याने आपला खेळ सोडला. तेव्हा बिग बींनी जसकरणला तुला खेळ सोडत असताना, त्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल असे सांगितले. त्यावेळी जसकरणने त्या प्रश्नाचे उत्तर C. मीताध्वज असे दिले. पण ते त्याचं उत्तर चुकीचं ठरलं असून त्या प्रश्नाचं खरं उत्तर D. प्रभंजना आहे. (Serial)

KBC15 7 Crore Question
Suvrat Joshi Post: ‘अनेकांना बॅगा, घड्याळ इत्यादीची भुरळ पडते, पण मला...’; ‘ताली’ फेम अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

जसकरण सिंहच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल बोलायचे तर, आयएएस होऊ पाहणाऱ्या जसकरणने फार हालाखीच्या दिवसात आपले शिक्षण पूर्ण केले. त्याचे वडील केटरिंगचे कामं तर, आजोबा छोले भटुरे विकतात आणि आजी किराणा दुकान चालवते. (Hindi Television)

जसकरणनंतर हॉट सीटवर पुढचा स्पर्धक अश्विनी कुमार आला आहे. त्याने गेल्या एपिसोडमध्ये, १०,००० रुपयांपर्यंत मानधन जिंकला आणि शो तिथेच संपला. आता दरम्यान अश्विनी कुमार हा स्पर्धक किती बक्षिस जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com