बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' चित्रपटाचा (Jawan Movie) प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धमाका सुरुच आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीला 'राजा राणी', 'मर्सल', 'बिजिली' आणि 'थेरी' यासारखे चित्रपट दिल्यानंतर डायरेक्टर अॅटली कुमार यांनी शाहरुख खानच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. त्यांच्या बॉलिवूडच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १.२० कोटींची बक्कळ कमाई केली. याचदरम्यान, 'जवान' चित्रपटावर मोठा आरोप करण्यात आला आहे.
एकीकडे जवान चित्रपटाचे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर काहींनी जवान चित्रपट हा सुपरहिट तमिळ चित्रपट 'थाई नाडू'ची कॉपी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी अॅटली कुमार यांच्यावर चित्रपटाची पटकथा चोरल्याचा आरोप केला आहे. याच कारणावरून आता सोशल मीडियावर अॅटली यांना ट्रोल केले जात आहे. नेटिझन्सनी 'जवान' चित्रपट आणि 'थाई नाडू' यामध्ये बरेच साम्य असल्याचे सांगितले आहे.
सध्या चित्रपट दिग्दर्शक अॅटली कुमार यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. लोकांचे म्हणणे आहे की, 'जवान' चित्रपट 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या सत्यराज यांच्या 'थाई नाडू' चित्रपटाच्या कथेची कॉपी आहे. नेटिझन्स वारंवार या दोन्ही चित्रपटांमध्ये साम्य असल्याचे सांगत निर्मात्याला फटकारत आहेत. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, एखाद्या सुपरहिट चित्रपटाच्या कथेशी इन्स्पायर होणं चूक नाही. पण 'जवान'च्या निर्मात्याने 'थाई नाडू' चित्रपटाच्या निर्मात्यांना क्रेडिट द्यायला पाहिजे होते.
अॅटली कुमार दिग्दर्शित 'जवान' चित्रपटामध्ये शाहरुख खानसह नयनतारा, योगी बाबू, रिद्धी डोगरा आणि सुनील ग्रोव्हर हे मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर दीपिका पदुकोणची या चित्रपटात छोटी भूमिका आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि अॅटली कुमार यांनी पहिल्यांदाच काम केले आहे. शाहरुख खानचा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानने दोन भूमिका साकारल्या आहेत. दोन्ही रोल प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहेत.
या चित्रपटात शाहरुख खानने केलेल्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास १२० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे आणि याचा अंदाज या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगवरून सर्वांना आला आहे. आता हा चित्रपट येत्या काही दिवसांमध्ये नेमकी किती कमाई करणार आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.